बॉलीवूडमध्ये किंग खान म्हणून ओळख असलेल्या शाहरुख खान(Shah Rukh Khan)चा ‘रईस’ हा चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाला होता. मात्र, शाहरुख खान चित्रपटाचा भाग होण्यापूर्वी अनेक अभिनेत्यांना या भूमिकेसाठी विचारले होते, असा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया यांनी केला आहे. नुकतीच त्यांनी ‘माशाबल’साठी कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाब्रा यांना मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी म्हटले की, जरी अनेक इतर अभिनेत्यांना या भूमिकेसाठी विचारणा केली होती, तरीदेखील शाहरुख खानने ही भूमिका साकारावी असे मला वाटत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“त्याला चित्रपटाच्या शेवटी…”

राहुल ढोलकिया यांनी याबद्दल बोलताना म्हटले, “मला आठवतं, मी मन्नत जवळील एका हॉटेलकडे कॉफी पिण्यासाठी जात होतो, त्यावेळी सारिकाने मला शाहरुखला स्क्रिप्ट पाठवण्याबाबत सांगितले. तो त्या भूमिकेसाठी योग्य अभिनेता होता आणि मी त्याला रईस म्हणून बघू शकत होतो. पण, तोपर्यंत माझी त्याच्याशी ओळख नव्हती. सारिकाने मला कुठूनतरी त्याचा मोबाइल नंबर मिळवून दिला. मी त्याला मेसेज केला, पण त्याने कधीच रिप्लाय दिला नाही”, असे राहुल ढोलकिया यांनी हसत सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले, “मी इरफान खानला या भूमिकेसाठी विचारले होते. पण, अभिनेत्याने ही स्क्रीप्ट नाकारली कारण त्याला चित्रपटाच्या शेवटी मरायचे नव्हते. मात्र, रईसला मरावेच लागणार होते. त्यानंतर जेव्हा मी नवाजुद्दीन सिद्दिकीला या भूमिकेविषयी विचारणा केली, तर त्याला रईसऐवजी पोलिसाची भूमिका साकारायची होती. महत्त्वाची बाब अशी की, इरफान खानलादेखील एसीपी जयदीप मजुमदारची भूमिका साकारयची होती. चित्रपटात दोन पोलिस असणे अशक्य होते.”

“फरहान अख्तरला जेव्हा मी या चित्रपटाची स्क्रिप्ट पाठवली, तेव्हा त्याला मोठ्या प्रोजेक्टचे स्वरूप आले. फरहान अख्तरने रितेश सिधवानीबरोबर चित्रपटाची निर्मिती करण्याची इच्छा व्यक्त केली. रितेशने मला शॉर्टलिस्ट केलेल्या पाच अभिनेत्यांची नावे विचारली, तेव्हा मी शाहरुखचे नाव दिले होते. त्यावर तो खूप हसला होता. मी त्याला सांगितले की, शाहरुखला चित्रपटात घेण्यासाठी मी गांभीर्याने विचार करत आहे. शेवटी शाहरुख चित्रपटाचा भाग बनला. त्याच्याबरोबर काम करणे हा आयुष्य बदलवणारा अनुभव होता.”

हेही वाचा: Video: “जय बजरंगबली…”, ‘सिंघम अगेन’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित, पाहा व्हिडीओ

रईस चित्रपटात शाहरुख खानबरोबर नवाजुद्दीन सिद्दिकी, माहिरा खान, जयदीप अहलावत हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले होते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने उत्तम कमाई केली होती. याबरोबरच समीक्षकांनीदेखील या चित्रपटाची प्रशंसा केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director rahul dholakia reveals late actor irfan khan rejected raees movie script because he didnt want to die in the end shah rukh khan played main role nsp