‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला. ‘द काश्मीर फाईल्स’ या वेगळ्या आणि गंभीर विषयावरील चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, अगदी त्याचप्रमाणे ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटसुद्धा लोक उत्सुकतेने पाहतील, अशी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना आशा होती. प्रदर्शनापूर्वी त्यांनी अनेक वेळा या चित्रपटाची तुलना ‘द काश्मीर फाईल्स’सोबत केली होती. परंतु प्रदर्शित झाल्यावर अगदी पहिल्याच आठवड्यात या चित्रपटापुढे फ्लॉपची पाटी लागली.
हेही वाचा : डोसा शेफला तब्बल २८ लाख पगार! शशांक केतकर व्हिडीओ शेअर करत म्हणाला…
‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट फ्लॉप ठरण्याचे मुख्य कारण म्हणजे शाहरूख खानचा ‘पठाण’. दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्यानुसार ‘गांधी गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाचे रिलिज टायमिंग चुकले होते. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राजकुमार संतोषी म्हणाले, “‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाकडून मला भरपूर अपेक्षा होत्या. यामुळे समाजात काहीतरी बदल होईल, असेही वाटत होते. परंतु चित्रपट प्रदर्शनाची वेळ चुकली. मी चित्रपटाच्या पब्लिसिटीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करणे अपेक्षित होते. याची खंत कायम मनात राहील.”
दिग्दर्शक राजकुमार संतोषी पुढे म्हणाले, “जानेवारी महिन्यात शाहरूख खानचा ‘पठाण’ चित्रपटही प्रदर्शनासाठी तयार होता. ‘पठाण’ने लोकांच्या मनावर अशी काही जादू केली की, माझ्या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. अर्थात ‘पठाण’च्या टीमने प्रमोशन, पब्लिसिटी या सगळ्या विषयांवर मोठ्या प्रमाणात काम केले होते. ‘पठाण’ चित्रपटाचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रचार झाला आणि शाहरूखच्या कमबॅकमुळेही प्रेक्षकांनी पसंती दिली. असो, या सगळ्या गोष्टी चित्रपटसृष्टीत सुरूच असतात.”
हेही वाचा : प्रियांका चोप्राला भेटण्यासाठी एक मुलगा थेट बाल्कनीत घुसला अन्…
दरम्यान, बॉक्स ऑफिसवर ‘पठाण’ २५ जानेवारी, तर ‘गांधी गोडसे एक युद्ध’ हा सिनेमा २६ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’मध्ये शाहरूखचे कमबॅक असल्याने या चित्रपटाने पहिल्याच दिवशी करोडोंच्या घरात कमाई केली होती. मात्र, दुसरीकडे ‘गांधी गोडसे एक युद्ध’ चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही.