‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशानंतर आमिर खान चर्चेत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला पाठ फिरवली असून बॉक्स ऑफिवर हा चित्रपट आपटला आहे. आता आमिर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘सलाम वेंकी’ या चित्रपटात तो एक विशेष भूमिकेत दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मुंबईत पार पडला. या चित्रपटाची दिग्दर्शिका दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती हिने चित्रपटाबद्दल आणि आमिरच्या भूमिकेबद्दल माध्यमांना माहिती दिली. आमिर खान चित्रपटात कसा आला यावर बोलताना तिने सांगितले, “मी आमिरला जेव्हा विचारले तेव्हा तो म्हणाला मला माझे सीन्स वाचायचे आहेत. मी त्याला सीन्स पाठवले आमच्या लेखकांनी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा तो म्हणाला मी हा चित्रपट करण्यासाठी तयार आहे. आम्ही जेव्हा पटकथेचे वाचन केले तेव्हा आमिरने सांगितले की मी यातील एकही शब्द बदलणार नाही.”

प्रियांका चोप्राचा नवरा ‘या’ गंभीर आजाराने ग्रस्त; लक्षणं सांगत व्हिडीओ केला शेअर

चित्रपटाच्या अखेरीस आमिर खानची झलक पाहायला मिळते. आमिर या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. पण त्याची या चित्रपटामधील झलक पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. शिवाय राजीव खंडेलवाल, प्रकाश राज या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील.

सलाम वेंकी’चा ट्रेलर पाहता चित्रपटाची कथा आई व मुलाच्या नात्यावर आधारित असल्याचं दिसून येतं. सुजाता (काजोल) व तिचा मुलगा वेंकी (विशाल जेठवा) यांच्या एकत्रित सीनपासूनच चित्रपटाच्या ट्रेलरला सुरुवात होते. वेंकीला कधीही बरा न होणाऱ्या आजाराची लागण होते. रेवतीने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट येत्या ९ डिसेंबरला बॉक्स ऑफिसवर दाखल होईल.