भारतीय सिनेमाला अप्रतिम चित्रपट देणारे पटकथा लेखक आणि दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांनी अनुपम खेर यांच्या ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटावर सडकून टीका केली आहे. इफ्फीचे ज्युरी प्रमुख नदाव लॅपिड यांनी या चित्रपटाबद्दल दिलेल्या प्रतिक्रियेवरनंतर बराच वाद झाला होता. आता सईद यांनीही चित्रपटाबदद्ल त्यांचं मत व्यक्त केलं आहे. वादग्रस्त राहिलेला ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर इतका यशस्वी कसा ठरला, याबद्दलही त्यांनी भाष्य केलं.

“मी लवकरच मेसेजचे स्क्रीनशॉट…” घटस्फोटावरुन ट्रोल करणाऱ्यांना मानसी नाईकचे सडेतोड उत्तर

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
loksatta readers response
लोकमानस : अदानी देशापेक्षा मोठे आहेत का?
Pushpa 2 The Rule
‘पुष्पा २’ चित्रपट पाहताना ३५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; सफाई कर्मचाऱ्याला आढळला मृतदेह
bmc and film city administration meeting on waste management
चित्रनगरीतील कचऱ्याची जबाबदारी कोणाची ? महापालिका आणि फिल्मसिटी प्रशासनामध्ये समन्वय बैठक होणार
Marathi actor Kushal Badrike funny post and share photos with wife
“आमचा संसार चालत नाही, तो…”, कुशल बद्रिकेची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
Mumbai ed investigation reveals Mehmood Bhagad is mastermind behind Rs 100 crore Malegaon scam
मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणः मुख्य सूत्रधाराची ओळख पटली, दुबईतील पाच कंपन्यांच्या खात्यावरही ४ कोटी रुपये जमा

अलीकडेच ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी काश्मीर फाइल्सबद्दल बोलताना सईद अख्तर मिर्झा म्हणाले, “माझ्यासाठी काश्मीर फाइल्स हा चित्रपट कचरा आहे. काश्मिरी पंडितांचा मुद्दा कचरा आहे का? तर नाही. त्यांचा मुद्दा खरा आहे. पण तो फक्त काश्मिरी हिंदूंचा आहे का? तर नाही. अनेक मुस्लीम देखील गुप्तचर संस्था, तथाकथित राष्ट्रीय हितसंबंध असलेली राष्ट्रे आणि सीमेपलीकडून पैसा घेणारे लोक, यांच्या षडयंत्रात अडकले आहेत. मुद्दा बाजू घेण्याचा नक्कीच नाही. पण, माणूस व्हा, माणुसकी दाखवा आणि मुद्दा समजून घेण्याचा प्रयत्न करा.”

‘कॉफी विथ करण’ ते ‘द रिंग ऑफ पॉवर्स’; २०२२ मध्ये या वेबसीरिजची झाली सर्वात जास्त चर्चा

दरम्यान, सईद अख्तर मिर्झा हे चित्रपटसृष्टीतील दिग्गज पटकथा लेखक आणि दिग्दर्शक आहेत. त्यांनी ‘नसीम आणि अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यूँ आता है’ यासारखं अप्रतिम गाणं दिलंय. तसेच त्यांनी ‘नुक्कड’ आणि ‘इंतेझार’ सारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांही प्रेक्षकांना दिल्या आहेत.

काय म्हणाले होते नदाव लॅपिड?

इस्त्रायलमधील चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते लॅपिड गोव्यात इफ्फीमध्ये बोलताना चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया देताना असे म्हणाले होते की, “द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर आम्ही सर्वजण विचलित झालो आहोत. हा चित्रपट म्हणजे त्रस्त करणार अनुभव आहे. हा चित्रपट आम्हाला व्हलगर (अश्लील) तसेच प्रपोगंडा (विशिष्ट उद्देशाने प्रचार करण्याच्या हेतूने बनवलेला) वाटला. इतक्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवणं योग्य नाही. मी माझ्या भावना या मंचावर मोकळेपणाने मांडू शकतो. ही चर्चा होणं गरजेचं आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता ही चर्चा होणं कलेसाठी गरजेचं आहे,” असं लॅपिड म्हणाले होते.

Story img Loader