हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांच्या ‘फायटर’ या चित्रपटाला चाहते, समीक्षक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिद्धार्थ आनंदच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी २२.५ कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये हळूहळू वाढ होत आहे. ‘फायटर’ या चित्रपटाने शनिवारी २८ कोटींहून अधिक कमाई केल्याचं स्पष्ट झालं आहे.

आत्तापर्यंत या चित्रपटाने जगभरात १३७.५ कोटींची कमाई केली आहे. तर भारतात याने ११८ कोटींची कमाई करत १०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री घेतली आहे. अशातच आता या चित्रपटाच्या सीक्वलचीही जबरदस्त चर्चा होत आहे. पहिल्या भागाला मिळणारं प्रेम आणि एकूणच प्रतिसाद पाहता ‘फायटर २’ बनवण्याबद्दल सिद्धार्थ आनंद यांनी भाष्य केलं आहे.

NHSRCL is working on Mumbai Ahmedabad bullet train project
बुलेट ट्रेनचा २१० मीटर लांबीचा पूल उभारला
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
magsaysay award sonam wangchuck
खरा ‘रँचो’ कोणता? महावीरचक्र विजेता, की मॅगसेसे विजेता? विकीपीडियाने…
Atal Setu , Atal Setu one year , Atal Setu Transport ,
वर्षभरात अटल सेतूवरुन धावली ८२ लाख ८१ हजार वाहने, सेतू वाहतूक सेवेत दाखल होऊन एक वर्षे पूर्ण
Pramod kumar Success Story
Success Story : ‘स्वप्न एका रात्रीत पूर्ण होत नाही!’ केवळ २,५०० केली व्यवसायाची सुरुवात; मेहनतीच्या जोरावर उभारली ५० कोटींची कंपनी
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे
Swapnil Joshi and Prasad Oak opinion that story is important actors are secondary at Jilbi trailer launch
“कथा मुख्य, कलाकार दुय्यम”, ‘जिलबी’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अभिनेते स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक यांचे मत
PMC companies contributed crores from CSR funds is unused
सात कोटींची रक्कम पालिकेकडे पडून? नक्की काय आहे प्रकार

आणखी वाचा : Bigg Boss 17: गुजरातचा समोसेवाला मुनव्वर फारुकी झाला ‘बिग बॉस १७’चा विजेता

‘पिंकव्हीला’शी संवाद साधताना सिद्धार्थ आनंद म्हणाले, “आता हे प्रेक्षकांनी ठरवायची गोष्ट आहे. अद्याप चित्रपट प्रदर्शित होऊन केवळ तीन दिवसच झाले आहेत. प्रेक्षकांकडून मिळणारं प्रेमच ठरवेल आम्ही पुढे काय करणार आहोत ते, आम्हाला ‘फायटर २’ आणखी भव्यदिव्यपणे सादर करायला आवडेल. बहुतेक मी काही मोजक्या दिग्दर्शकांपैकी एक आहे ज्याने आजवर सीक्वल बनवलेला नाही. मी कायम स्वतःला सीक्वल्सच्या मोहापासून लांब ठेवलं आहे, अजूनतरी मला एखाद्या चित्रपटाचा सीक्वल काढावा असं वाटलेलं नाही.”

गुरुवार २५ जानेवारी रोजी ‘फायटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर यांच्यासह अक्षय ओबेरॉय, करण सिंग ग्रोव्हर आणि संजीदा शेख यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटात हृतिक रोशन व दीपिका पदूकोण ही जोडी प्रथमच पडद्यावर दिसली अन् प्रेक्षकांना ती पसंतही पडली. तसेच चित्रपटातील काही बोल्ड सीन्सवर सेन्सॉरने कात्री चालवल्याने हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता.

Story img Loader