गेल्या काही वर्षांमधून अनेक बॉलीवुड चित्रपटांवरून वाद निर्माण आहेत. होणाऱ्या टीकेमुळे प्रदर्शनाच्या आधी किंवा नंतर चित्रपटांमध्ये मोठे बदल करण्यात आले. यामध्ये ‘पद्मावत’, ‘पठाण’, ‘आदिपुरुष’ यांसारख्या बिग बजेट चित्रपटांचा समावेश आहे. पण १९९४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम आपके है कौन’ या ब्लॉगबस्टर चित्रपटातही प्रदर्शनाच्या नंतर मोठा बदल करण्यात आला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचं दिग्दर्शन सूरज बडजात्या यांनी केलं होतं. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर २५० कोटी इतकी कमाई केली होती. हा त्या वेळेचा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होता. आजही हा चित्रपट प्रेक्षक तितक्याच आवडीने बघतात. या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. या चित्रपटाला कोणताही विरोध झाला नाही, पण या चित्रपटामध्ये प्रदर्शनाच्या नंतर एका खास कारणास्तव बदल करण्यात आला.

आणखी वाचा : दिलीप जोशींनी सलमान खानबरोबर रूम शेअर केली होती तेव्हा ‘असा’ वागायचा ‘भाईजान’, आठवण शेअर करत म्हणाले…

हेही वाचा : ‘हम आपके है कौन…!’ चित्रपटतील रेणुका शहाणे यांचा ‘तो’ सीन शूट करताना ढसढसा रडल्या होत्या रीमा लागू

‘हम आपके है कौन’ हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याला म्हणावा तितका चांगला प्रतिसाद मिळाला नाही. हा चित्रपट साडेतीन तासांहून अधिक मोठा होता. ते लक्षात आल्यावर दिग्दर्शक सुरज बडजात्य यांनी त्यांच्या हिशोबाने हा चित्रपट थोडा एडिट केला आणि या चित्रपटाची लांबी कमी केली. त्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Director suraj barjatya edited film hum aapke hai kaun and shorts its length rnv