‘द कश्मीर फाईल्स’ काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. चित्रपटाने ३०० कोटींचा टप्पा ओलांडला आणि बॉक्स ऑफिसवर एक वेगळाच विक्रम रचला. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटात अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार महत्त्वाच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटामुळे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हे बरेच चर्चेत आले.

आता पुन्हा एका मुलाखतीमध्ये दिलेल्या वक्तव्यामुळे विवेक अग्निहोत्री चर्चेत आले आहेत. विवेक अग्निहोत्री हे लवकरच महाभारतावर चित्रपट बनवणार आहेत अशी अफवा मध्यंतरी पसरली होती. त्यावरच भाष्य करताना आता हा चित्रपट करायचं मनावर घेतलं पाहिजे असं वक्तव्य विवेक अग्निहोत्री यांनी केलं आहे.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rajkummar Hirani
राजकुमार हिरानींनी सांगितलं ‘संजू’ चित्रपट बनवण्याचं खरं कारण; म्हणाले, “त्याने मला भेटण्यासाठी बोलावलं…”
Ramesh Deo
मुंबईतील ‘या’ रस्त्याला दिले दिवंगत अभिनेते रमेश देव यांचे नाव; अजिंक्य देव भावना व्यक्त करत म्हणाले, “त्यांनाही निश्चितच आनंद…”
rakesh roshan
“वाईट बातमी…”, गोळीबाराच्या घटनेनंतरही राकेश रोशन यांना हृतिकसाठी अंडरवर्ल्डमधून यायचे धमक्यांचे फोन; खुलासा करत म्हणाले…
Akshay Kumar
“स्टंट पाहून दिग्दर्शक घाबरून पळून गेले…”, अक्षय कुमारने सांगितला २७ वर्षे जुन्या चित्रपटाचा रंजक किस्सा
r madhavan on six pack abs
“माझ्याकडे सिक्स पॅक्स नाहीत, मला डान्सही येत नाही तरीही…”; २५ वर्षे सिनेसृष्टीत काम करणाऱ्या बॉलीवूड अभिनेत्याचं वक्तव्य चर्चेत
marathi actor shares his opinion on chhaava movie
“लहान तोंडी मोठा घास, पण…”, ‘छावा’चा ट्रेलर पाहून मराठी अभिनेत्याने व्यक्त केली ‘ती’ खंत; विकी कौशलबद्दल म्हणाला…

आणखी वाचा : अक्षय कुमारच्या ‘ओह माय गॉड २’ ने सहाव्या दिवशी रचला इतिहास; ‘इतक्या’ कोटींचा टप्पा केला पार

‘टाइम्स नाऊ’शी संवाद साधताना विवेक अग्निहोत्री म्हणाले, “मी महाभारत हा चित्रपट बनवणार आहे अशी अफवा कुणी पसरवली आहे हे मला खरंच ठाऊक नाही, पण आता मी यावर गांभीर्याने विचार करतोय. मी माझं संपूर्ण आयुष्य ही महाकाव्य वाचण्यात, संशोधन करण्यात आणि त्यावर भाषणं देण्यात घालवलं आहे, पण मी जर महाभारत बनवायचं ठरवलं तर मी ते इतिहासाच्या अनुषंगाने बनवेन. इतर लोक बॉक्स ऑफिससाठी कलाकृती करतात पण मी ती कलाकृती लोकांसाठी करू इच्छितो. बऱ्याच कलाकृतीमध्ये अर्जुन, कर्ण आणि भीम यांचं उदात्तीकरण केलेलं बघायला मिळतं, पण माझ्या डोळ्यासमोर महाभारत म्हणजे धर्म विरुद्ध अधर्म असंच उभं राहतं.”

विवेक अग्निहोत्री यांच्या या घोषणेमुळे त्यांच्या आगामी चित्रपटाची लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. सध्या ते त्यांच्या आगामी ‘द व्हॅक्सीन वॉर’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. नुकतंच स्वातंत्र्यदिनानिमित्त त्यांच्या या आगामी चित्रपटाची एक छोटीशी झलकही पाहायला मिळाली. या चित्रपटात नाना पाटेकर, अनुपम खेर, पल्लवी जोशी हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Story img Loader