‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटाने विवेक अग्निहोत्री हे नाव आज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचले आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. इस्रायलच्या दिग्दर्शकाने या चित्रपटावर टीका केल्याने विवेक अग्निहोत्री चांगलेच संतापले होते. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ते कायमच राजकीय सामाजिक आणि बॉलिवूड चित्रपटसृष्टीवर भाष्य करत असतात. नुकतीच त्यांनी नाव न घेता शाहरुख खानवर टीका केली आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे गाणं प्रदर्शित झालं आहे. या गाण्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा असताना आता विवेक अग्निहोत्री यांनी नाव न घेता या गाण्यावर टीका केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असं लिहले की, “पूर्वी इन्स्टाग्राम रील्स बॉलिवूडच्या गाण्यांची कॉपी असल्यासारखे दिसायचे, आता आता बॉलिवूडची गाणी इन्स्टा रीलची कॉपी असल्यासारखे दिसतात.” अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.

Navari Mile Hitlarla
Video: सत्य की स्वप्न? लीला व एजेमधील जवळीकता वाढणार; प्रोमोवर नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट; म्हणाले, “आमच्या अपेक्षा…”
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
Little girl Dance
“काय भारी नाचते राव ही”, गोंडस चिमुकलीने केला जबरदस्त डान्स, Viral Video पाहून तिचे चाहते व्हाल
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Shashank Ketkar
‘मुरांबा’ मालिकेचे ९०० भाग पूर्ण; व्हिडीओ शेअर करत शशांक केतकर म्हणाला, “खूप भावुक…”

Ved Movie Trailer : “ज्याचं आपल्यावर प्रेम…” रितेश-जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

विवेक अग्निहोत्री यांच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यातही शाहरुख खानच्या चाहत्यांनी कमेंट करण्यास सुरवात केली आहे. एकाने त्यांचे जुने शाहरुख खानचे कौतुक करणारे ट्वीट परत रिट्वीट करत त्यांच्यावर निशाणा साधला आहे. दुसऱ्याने लिहले आहे “सगळ्याच गोष्टी वाईट नसतात”. एकाने तर त्यांच्या जुन्या चित्रपटांचे पोस्टर्स ट्वीट केले आहेत आणि कमेंट केली आहे “जरा आपल्या चित्रपटांवर बोला,” अशा शब्दात नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

‘द काश्मीर फाईल्स’च्या यशानंतर विवेक अग्निहोत्री ‘दिल्ली फाईल्स’ या चित्रपटावर काम करत आहेत. तसेच त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटावर ते काम करत आहेत त्या संदर्भातील फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

Story img Loader