वयाच्या १४ व्या वर्षी ‘हम नौजवान’ या चित्रपटातून तब्बू(Tabu)ने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. ‘अंधाधून’, ‘फिलहाल’, ‘माचिस’, ‘चांदनी बार, दृश्यम, गोलमाल अगेन, विजयपथ, विरासत अशा अनेक चित्रपटात अभिनेत्रीने काम करत तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अनेक नायकांबरोबर काम केले आहे. मात्र, २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटात तिने अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम करण्यास नकार दिला होता. बागबान चित्रपटाचे दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या पत्नी रेनू चोप्रा यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रेनू चोप्रा यांनी नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत रेनू चोप्रा यांनी बागबान चित्रपटाची आठवण सांगताना म्हटले, “आम्ही तब्बूला कास्ट करण्याचा विचार करत होतो. तिने चित्रपटाची स्क्रीप्ट सांगण्यासाठी आग्रह केला. ती स्क्रीप्ट ऐकताना रडत होती. तिला चित्रपटाची स्क्रीप्ट आवडली होती. त्यामुळे ती या चित्रपटात काम करण्यासाठी होकार देईल, असा मी विचार करत होते. माझ्याशेजारी कोणीतरी बसले होते आणि त्या व्यक्तीने मला सांगितले की जेव्हा स्क्रीप्ट ऐकताना तब्बू रडते, तेव्हा ती चित्रपटात काम करत नाही. त्यानंतर मी तब्बूला विचारलं की तू चित्रपटात काम करणार नाहीस का? त्यावर तिने मला म्हटले की मला ही गोष्ट खूप आवडली आहे. पण, मी चार मुलांच्या आईची भूमिका साकारू शकत नाही. माझे संपूर्ण करिअर माझ्यासमोर आहे. रवीजी मला माफ करा”, असे म्हणत तब्बूने शांतपणे या चित्रपटाला नकार दिल्याची आठवण रेनू चोप्रा यांनी सांगितली. त्यानंतर ही भूमिका हेमा मालिनी साकारली. जेव्हा तब्बूला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती, त्यावेळी ती ३६ वर्षांची होती, तर अमिताभ बच्चन ६५ वर्षांचे होते.

तब्बूने भूमिका नाकारल्यानंतर बागबान चित्रपटातील भूमिका हेमा मालिनी यांनी साकारली. याच्या दोन वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यावेळी तब्बू हैद्राबादमध्ये होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेत्री तीच्या काका-काकूसह चित्रपट पाहण्यास गेली. त्यावेळी तिने तिच्या काकूला सांगितले की या भूमिकेसाठी विचारणा झाली होती, पण मी ही भूमिका साकारण्यास नकार दिला. यावेळी तिला तिच्या काकूने या भूमिकेला नकार दिल्याबद्दल ओरडले होते.

दरम्यान, बागबान हा चित्रपट रवी चोप्रा यांनी दिग्दर्शित केला असून याची पटकथा व निर्मिती बी.आर. चोप्रा यांनी केली आहे. या चित्रपटाला मोठे यश मिळाले होते. याबरोबरच, तब्बूने बागबान या चित्रपटात जरी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले नसले तरी आर बल्की दिग्दर्शित चीनी कुम या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर प्रमुख भूमिकेत काम केले होते.