एखादा नवीन चित्रपट आला आणि त्याचे रिव्ह्यू चांगले असतील, सगळीकडे चर्चा होत असेल तर अनेकजण तो चित्रपट पाहायला आवर्जून जातात. दर आठवड्याला अनेक चित्रपट रिलीज होतात, काही फ्लॉप होतात तर काही हिट होतात. हिट चित्रपट पाहायला अनेकांना आवडतं. मात्र काही लोकांना फ्लॉप चित्रपट पाहण्याची आवड असते. असाच एक बॉलीवूड चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप झाला. तो आता ओटीटीवर उपलब्ध आहे.

तुम्ही दर आठवड्याला ओटीटीवर येणार नवनवीन सिनेमे पाहत असाल. पण हा चित्रपट सात वर्षांपूर्वी आला होता. खरं तर या चित्रपटात तगडी स्टारकास्ट होती. निर्मात्यांनी तब्बल ३१० कोटी रुपये खर्च करून त्याची निर्मिती केली होती. पण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटाचे नाव आहे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’. आमिर खानचा हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या फ्लॉप सिनेमांपैकी एक आहे.

सात वर्षांपूर्वी २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. ट्रेलर आल्यापासून चित्रपटाबद्दल नकारात्मक पसरली होती. आमिर खान अमिताभ बच्चन असे दोन दिग्गज मुख्य भूमिकेत असूनही कथा दमदार नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. व्हीएफएक्स व ग्राफिक्सचा सिनेमात खूप वापर करण्यात आला होता.

या चित्रपटात १७९५ चा काळ दाखवण्यात आला होता. तेव्हा भारताला हिंदुस्थान म्हटलं जायचं. तर भारतीय बँडिट्सना ठग्स म्हटलं जायचं. कंटेंट चांगला नसेल तर कितीही खर्च करून चित्रपटाची निर्मिती केली असेल आणि कितीही मोठे स्टार्स असतील तरी चित्रपटाकडे प्रेक्षक पाठव फिरवतील हे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने सिद्ध केलं.

चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्यने केलं होतं. तब्बल ३१० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. भारतात त्याने फक्त १५१.३० कोटींचे कलेक्शन केले होते. आणि जगभरातील कलेक्शन ३२७ कोटी रुपये होतं. हा त्या वर्षीच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक होता.

या चित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाची कथा १७९५ मधील ब्रिटीश इंडियाच्या काळावर बेतलेली आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो युट्यूब किंवा प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.