बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार. काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे खूप चर्चेत आले. गेली अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. परंतु आतापर्यंत कधीही त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल भाष्य केले नाही. टायगरशी ब्रेकअप झाल्यावर नुकतीच दिशा पटानी टायगरची बहीण कृष्णा श्रॉफसोबत दिसली. या दोघींना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : गणितज्ञ डॉ. वशिष्ठ नारायण सिंह यांच्या बायोपिकमधून हृतिक रोशनचा पत्ता कट, जाणून घ्या कारण

सध्या दिशा आणि कृष्णा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. दिशा पटानी आणि कृष्णा श्रॉफ रविवारी जेवणासाठी एका हॉटेलमध्ये गेल्या होत्या. त्या दोघांनी मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केले आणि नंतर कारमधून एकत्रच निघाल्या. या दरम्यान, दिशा कृष्णाचा हात पकडून तिची खूप काळजी घेताना दिसली. या दोघींमधील हा बॉन्ड पाहून चाहत्यांनी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ आणि दिशा पटानी यांच्यातील बॉन्ड पाहून नेटकरी आवक् झाले. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. एक नेटकरी म्हणाला, “तुम्हा दोघींचा हा बॉन्ड खूप गोड आहे.” तर अनेकांनी दिशाला “तुझं टायगर श्रॉफशी ब्रेकअप झालं होतं ना?” असा प्रश्नही विचारला. त्यासोबतच “तुझं आणि टायगरचं पॅचअप झालं आहे का?” असाही प्रश्न नेटकरी विचारत आहेत.

हेही वाचा : “तेव्हा मी स्वतःला ओळखू शकत नव्हते…” प्रियांका चोप्राने सांगितला शास्त्रक्रियेनंतरचा भयानक अनुभव

काही दिवसांपूर्वी दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमसोबत ‘एक व्हिलन २’मध्ये दिसली होती. आता ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पण आता ती आणि कृष्णा एकत्र दिसल्याने तिचे नाव पुन्हा एकदा टायगरशी जोडले गेले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani and krushna shroff had lunch date on sunday rnv