बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटातील भूमिका, सोशल मीडियावर केलेल्या पोस्ट, तर कधी त्यांची वक्तव्ये यांमुळे ते चर्चेत असतात. आता बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी प्रभासला डेट करीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
सोशल मीडियावर दिशाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिशाने आपल्या एका हातावर ‘पीडी’ या अक्षरांचा टॅटू काढल्याचे पाहायला मिळत आहे. आता अभिनेत्री आपल्या हातावरील टॅटूमुळे चर्चांचा भाग बनली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशाने तिच्या हातावर पीडी या दोन अक्षरांचा टॅटू काढला आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडच्या नावाचा टॅटू आपल्या हातावर काढल्याचा अंदाज अनेकांनी केला आहे. आता या पीडीचा अर्थ काय आणि ही अक्षरे कोणासाठी हातावर लिहिली आहेत याबद्दल नेटकरी चर्चा करताना दिसत आहेत. अनेकांनी पीडी म्हणजे प्रभास, असे म्हटले आहे; तर अनेकांनी प्रियांशु दत्ता, असे ते नाव असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी दिशाने स्वत:च्या नावाचीच अक्षरे उलट म्हणजेच पटानी दिशा, अशा रीतीने लिहिल्याचे म्हटले आहे.

व्हायरल होत असलेल्या दिशाच्या फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा टॉप आणि पांढऱ्या रंगाची पँट घातल्याचे दिसत आहे. त्यासोबत तिने काळ्या रंगाच्या सनग्लासेस आणि पांढऱ्या रंगाची बॅगही सोबत घेतली आहे. आता नेटकरी पीडी म्हणजे प्रभास, असे जरी म्हणत असले तरी दिशाने हे नक्की कोणाचे नाव आहे, तिचे स्वत:चेच नाव आहे की आणखी कोणाचे आहे याबद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

हेही वाचा : “नवरा फक्त नाचताना असतो वाटतं…”, म्हणणाऱ्याला ऐश्वर्या नारकरांनी सुनावलं; म्हणाल्या, “आवाज किती तुमचा…”

दरम्यान, दिशा पटानी नुकतीच कल्की २८९८ एडी या चित्रपटात दिसली आहे. त्यामध्ये तिने प्रभासच्या प्रेमिकाची भूमिका निभावली आहे. त्यामुळेदेखील प्रभास आणि दिशाचे नाव जोडले जात आहे. ते दोघे नात्यात असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दिशाशिवाय नाग आश्विन यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात दीपिका पदुकोण, मृणाल ठाकूर, बिग बी, कमल हासन, प्रभास , दुलकिर सलमान, विजय देवरकोंडा हे दिग्गज कलाकार अभिनय करताना दिसत आहे. पौराणिक कथेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. चित्रपटगृहात ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपट पाहण्यासाठी चाहते गर्दी करताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करीत या चित्रपटाने नवीन विक्रम केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani and prabhas dating rumers kalki 28 ad because tattoo of pd letters nsp