बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे. सध्या तिच्या वडिलांमुळे तिच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे. दिशा पाटनीचे वडील जगदीश सिंह पाटनी लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होताना दिसत आहे. उत्तर प्रदेशमध्ये पोलीस अधिकारी असलेले जगदीश सिंह अलिकडेच निवृत्त झाले आहेत. आता ते बरेली शहरातून महापौर पदासाठी निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा आहे.

दिशा पाटनीचे वडील राजकारणात प्रवेश करणार याची चर्चा शहरात त्यांच्या नाव आणि फोटोंचे होर्डिंग्स लागल्याने होऊ लागली आहे. ज्यानंतर जगदीश सिंह पाटनी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना काही पक्षांकडून उमेदवारीसाठी तिकिट देण्यासाठी उत्सुकता दाखवली गेल्याची माहिती मिळत आहे. मात्र जगदीश सिंह यांनी अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. सर्व पर्याय आणि नीट विचार करूनच आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “नव्या एक नंबर खोटारडी…” नातीबद्दल असं का म्हणाल्या जया बच्चन? वाचा

दरम्यान दिशा पाटनीबद्दल बोलायचं तर तिने बॉलिवूड चित्रपट ‘एम एस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मधून बॉलिवूड पदार्पण केलं होतं. पण आपल्या चित्रपटांपेक्षा ती टायगर श्रॉफसह असलेल्या रिलेशनशिपमुळेच जास्त चर्चेत राहिली होती. मध्यंतरीच्या काळात तिचं नाव आदित्य ठाकरे यांच्याशीही जोडलं गेलं होतं. दिशाच्या कामाबद्दल बोलायचं तर अलिकडेच ती ‘एक व्हिलन रिटर्न’मध्ये दिसली होती. आगामी काळात तिच्याकडे ‘योद्धा’ आणि ‘प्रोजेक्ट’ हे चित्रपट आहेत.

Story img Loader