अभिनेत्री दिशा पाटनीने बॉलीवूडमध्ये २०१५ ला पदार्पण केले. आजच्या घडीला दिशा आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते. सध्या अभिनेत्री तिच्या लव्हलाईफमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यांपूर्वी दिशाचे टायगर श्रॉफबरोबर ब्रेकअप झाल्यावर अभिनेत्री अनेकदा तिचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्ससह दिसली. आता अलेक्झांडरने दिशाच्या चेहऱ्याचा टॅटू हातावर बनवून घेतल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : “रक्ताने माखलेला शर्ट, बूटात राहिलेली माती अन्…”, समीर वानखेंडेच्या कामाचा पत्नी क्रांती रेडकरला अभिमान; म्हणाली, “ड्रग्जविरोधात…”

दिशाचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्सने गोंदवलेल्या टॅटूचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. नुकताच दिशा पाटनीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये दिशा, अलेक्झांडर आणि टायगर श्रॉफची बहीण कृष्णा एकत्र दिसत होते. या व्हिडीओमुळेच अलेक्झांडरने काढलेल्या टॅटूची चर्चा रंगली.

हेही वाचा : Video : तेजश्री प्रधानच्या ‘प्रेमाची गोष्ट’मध्ये अपूर्वा नेमळेकर ‘या’ भूमिकेत झळकणार, नवा प्रोमो पाहिलात का?

अलेक्झांडरच्या हातावर दिशाच्या चेहऱ्याचा टॅटू पाहिल्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. या व्हिडीओवर एका युजरने, “आता टायगर श्रॉफचे काय होणार?”, तर दुसऱ्या एका युजरने “टायगर अभी जिंदा है”, अन्य काही युजर्सनी “दिशा टॅटूमध्ये आदिवासी दिसतेय” अशा भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.

हेही वाचा : “बरं झालं आईबरोबर एकही सीन नव्हता…”, विराजस कुलकर्णीने सांगितला ‘सुभेदार’च्या शूटिंगचा अनुभव; म्हणाला, “अंगावर काटा…”

दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफ यांनी अनेक वर्षे एकमेकांना डेट केले. परंतु, दोघांनीही कधीच उघडपणे या नात्याचा स्वीकार केला नव्हता. मात्र, काही महिन्यांपूर्वी दोघांचे ब्रेकअप झाले. आता दिशा अलेक्झांडरसह रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. अभिनेत्रीने ‘लोफर’, ‘एम.एस.धोनी’, ‘बागी २’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. लवकरच ती ‘कल्कि २८९८ एडी’ या चित्रपट भूमिका साकारणार आहे.