बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. दिशा पाटनी तिच्या चित्रपटांपेक्षा फिटनेसमुळे जास्त ओळखली जाते. अनेकदा ती इन्स्टाग्रामवर तिचे फिटनेस व्हिडीओ आणि फोटो शेअर करताना दिसते. तसेच टोन्ड बॉडीचे फोटोही ती अनेकदा शेअर करते. पण आता दिशाने असा बिकिनी फोटो शेअर केला आहे ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे. तिचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.

दिशा पाटनीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिने कोणतंही कॅप्शन दिलेलं नाही. या फोटोमध्ये दिशा अॅनिमल प्रिंट बिकिनीमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. या फोटोमध्ये तिची टोन्ड बॉडी दिसत आहे. दिशाचे केस भिजलेले आहेत आणि तिचा एकंदर लूक खूपच हॉट दिसत आहेत. पण या फोटोमध्ये दिशाने कोणताही फिल्टर वापरलेला नाही आणि तिच्या पार्श्वभागावर असलेले स्ट्रेच मार्क्स स्पष्ट दिसत आहेत.

Vinod Kambli Emotional Statement on Sachin Tendulkar Said He Paid for My Surgeries
VIDEO: “सचिनने माझ्या शस्त्रक्रियेचा सगळा खर्च केला…”; विनोद कांबळीने भावुक होत सांगितला घटनाक्रम
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Marathi actress Hruta Durgule and Lalit Prabhakar new movie coming soon
“तू मला आधी का नाही भेटलास?” म्हणत हृता दुर्गुळेने ‘या’ मराठी अभिनेत्याबरोबरचा फोटो केला शेअर
Tula Shikvin Changlach Dhada Fame Actress Virisha Naik mehendi ceremony
मेहंदी रंगली गं! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेत्रीची लगीनघाई; ‘या’ दिवशी अडकणार विवाहबंधनात
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
varun dhwan baby john trailer launch
वरुण धवनचा रावडी अंदाज आणि जबरदस्त अ‍ॅक्शन असलेल्या ‘बेबी जॉन’चा ट्रेलर प्रदर्शित; अभिनेता म्हणाला, “हा सिनेमा खूपच…”

आणखी वाचा- ‘या’ अभिनेत्रीमुळे झालंय दिशा- टायगरचं ब्रेकअप? अभिनेत्याशी अफेअरच्या चर्चांना उधाण

दिशाच्या या सेल्फीवर कमेंट करत सोशल मीडिया युजर्सनी तिच्या हिंमतीची दाद दिली आहे. एका युजरने लिहिलं, “हे दाखवण्यासाठी धन्यवाद, की शरीरावर स्ट्रेच मार्क्स असणं सामान्य आहे.” दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “दिशाच्या शरीरावरही स्ट्रेच मार्क्स आहेत. आता मी शांतपणे जगू शकते.” याशिवाय आणखी एका युजरने, “मला हा फोटो खूप आवडला कारण यात कोणताही फिल्टर वापरलेला नाही.” तसेच काहींनी यावरून टायगरचं नाव घेत दिशाला ट्रोल करण्याचा प्रयत्नही केला आहे.

आणखी वाचा- “हिला तर नुसती फॅशन…”, एअरपोर्टवरील ‘त्या’ व्हिडीओमुळे ट्रोल झाली कियारा अडवाणी

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचं तर ती आगामी काळात दाक्षिणात्य अभिनेता सूर्याबरोबर दिसणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन Siruthai Siva ने केलं आहे. याशिवाय दिशा पाटनी करण जोहरचा आगामी चित्रपट ‘योद्धा’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राची मुख्य भूमिका आहे. तसेच प्रभासच्या ‘प्रोजेक्ट के’मध्येही दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्याबरोबर दिशाची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे.

Story img Loader