बॉलिवूड अभिनेत्री सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. चित्रपटापेक्षा त्या कोणाबरोबर डेटला जात असतात यावर चर्चा होत असते. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी हे बॉलिवूडमधील आघाडीचे कलाकार. काही महिन्यांपूर्वी ते त्यांच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे खूप चर्चेत आले. गेली अनेक वर्षे ते एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अलीकडेच दोघांचे ब्रेकअप झाल्याची बातमी समोर आली. सध्या तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिशा पटानीने भलेही इंडस्ट्रीत काही चित्रपटांमध्ये काम केले असेल, परंतु तिच्या सर्वच चित्रपटांमध्ये तिच्या दमदार अभिनयाने आणि तिच्या शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. सध्या तिच्या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ती एका नवीन व्यक्तीबरोबर दिसत आहे, ज्याच्याबद्दल लोक वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती ही तिचा जिम ट्रेनर आणि मित्र अलेक्झांडर अॅलेक्स आहे. त्यांना एकत्र पाहून तिचे चाहते अवाक झाले.

मुलगा हवा की मुलगी? प्रश्नावर रणबीर म्हणाला होता; “मला…”

दिशा, अलेक्झांडर हे दोघे मुंबईत एकत्र दिसले, यावेळी चाहते फोटोग्राफर यांच्यापासून तिचे सरंक्षण करत त्याने दिशाला गाडीत बसवले. दोघेही वांद्रे येथील एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडले होते. त्यानंतर पापाराझींच्या एका गटाने त्यांना घेरले. यादरम्यान एक चाहता दिशाशी बोलताना दिसला पण अलेक्झांडर अॅलेक्सने बॉडीगार्ड म्हणून काम केले. नेटकऱ्यांनी या दिशाला ट्रोलदेखील केले आहे. ‘हा कोण नवीन?’ असा सवाल तिला केला आहे.

नुकतीच दिशा पटानी टायगरची बहीण कृष्णा श्रॉफबरोबर दिसली. या दोघींना एकत्र पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.काही दिवसांपूर्वी दिशा पटानी अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहमसोबत ‘एक व्हिलन २’मध्ये दिसली होती. आता ती ‘योद्धा’ आणि ‘किक २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पण आता ती आणि कृष्णा एकत्र दिसल्याने तिचे नाव पुन्हा एकदा टायगरशी जोडले गेले आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disha patani spotted with her friend at bandras restaurant he protected her like boyfriend spg