Divya Khosla Mother Passed Away : बॉलीवूड अभिनेत्री-निर्माती दिव्या खोसला कुमारवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या आईचे निधन झाले असल्याची माहिती अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करून दिली आहे.
हेही वाचा : “रिजेक्शन, नकार यामुळे जीवनात…” आयुष्यमान खुरानाने केला संघर्षाच्या दिवसांबद्दल खुलासा
इन्स्टाग्रामवर भावुक पोस्ट शेअर करीत अभिनेत्री म्हणाली, “काही वेळापूर्वी मी माझ्या आईला गमावेल. आईच्या जाण्याने माझ्या हृदयात कायमची पोकळी निर्माण झाली. तुझे आशीर्वाद आणि तू सांगितलेली नैतिक मूल्य मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. तुझं मन अतिशय निर्मळ होतं, तुझ्यापोटी माझा जन्म झाला हे माझे भाग्य आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे आई…ओम शांती” या भावुक पोस्टच्या खाली दिव्याने अनिता खोसलाची मुलगी असे नमूद केले आहे.
हेही वाचा : “माय हॉटी…” रणवीर सिंहच्या वाढदिवसानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत
दिव्या कुमार खोसलाने या पोस्टबरोबर आईचे असंख्य फोटो शेअर केले आहेत. यातील पहिल्या फोटोत अभिनेत्री आपल्या आईशी जवळपास ५४ मिनिटे फोनवर संभाषण करत असल्याचे दिसत आहे. दिव्याने तिच्या आईचा फोननंबर ‘मम्मा’ असा सेव्ह केलेला दिसत आहे. आणखी काही फोटोंमध्ये तिचा मुलगा आणि आई एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत.
दरम्यान, अलीकडेच दिव्या कुमार खोसलाने तिच्या ‘यारियां २’ चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे. या चित्रपटाद्वारे दिव्या खोसला सात वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून पुनरागमन करत आहे. ‘सनम रे’ हा तिने दिग्दर्शित केलेला शेवटचा चित्रपट होता.