देशातील पंतप्रधांनापासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत सगळेचजण दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. बॉलिवूडचे कलाकारदेखील हा सण मोठ्या आनंदाने साजरा करत आहेत. आपापल्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन करत आहेत. सध्या चर्चा आहे ती स्टार किड्सची, आजकाल पार्ट्यांमध्ये स्टार किड्स दिसू लागले आहेत, आमिरची लेक आयरा खाननेदेखील चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आयराने आपल्या बॉयफ्रेंड आणि मित्र मैत्रिणीबरोबर फोटो शेअर करत या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दोघे पारंपरिक वेशात दिसत आहे. आयराने पांढरी साडी परिधान केली आहे, तर नुपूरने कुर्ता परिधान केले आहे. दोघे फोटोंमध्ये नेहमीप्रमाणे आनंदी दिसत आहेत. त्यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनीदेखील कौतुक केले आहे. काहींचं म्हणणं आहे ती दाक्षिणात्य अभिनेत्रीसारखी दिसत आहे. तर एकाने लिहले आहे ओणम सणाला साडी नेसतात तशी साडी आहे. साडीला जरा इस्त्री करायची असेही काहीजण म्हणालेत. काहींनी तिला आमिरवरून ट्रोल केले आहे.
अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आणि तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे चर्चेत असतात. बॉयफ्रेंड नुपूर शिखरेबरोबर ती नेहमीच बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. एकमेकांना डेट करणारं हे कपल आता लवकरच अधिकृतरित्या विवाहबंधनात अडकणार असल्याची चिन्ह दिसत आहेत.