सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. दोन दिवसांनी २८ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय पल्लवी जोशी आणि गिरीजा ओक गोडबोलेदेखील दिसणार आहे. ज्यांनी स्वदेशी BBV152 लस बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, त्या शास्त्रज्ञांची कथा ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये दाखविण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“त्यांनी मला फोन केला अन्…”, शैलेश लोढांचा असित मोदींबद्दल मोठा दावा; म्हणाले, “कलाकारांना नोकरांप्रमाणे…”

विवेक अग्निहोत्री त्यांच्या आगामी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाबाबत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) युजर्सच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अशातच एका युजरने केलेल्या कमेंटला विवेक यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. रविवारपासून ‘द व्हॅक्सिन वॉर’चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. विवेक यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली. त्यानंतर एक युजर म्हणाला, “माझ्या मते, तुमचे चित्रपट पाहण्यासारखे नाहीत. त्यामुळे मी लोकांना आवाहन करतो की, द व्हॅक्सिन वॉर पाहून आपला वेळ वाया घालवू नका. भगवान श्री राम तुम्हाला बुद्धी देवोत.”

“त्यांना वाटत असेल की मी खूप…”, ‘वेलकम टू द जंगल’चा भाग नसण्याबद्दल स्पष्टच बोलले नाना पाटेकर

युजरच्या या कमेंटवर विवेक अग्निहोत्री गप्प बसले नाहीत. त्यांनी युजरला उत्तर दिलं. “तुम्ही हे ट्विट लिहून वेळ वाया घालवला. याचा अर्थ तुम्हाला भीती वाटत आहे.”

दरम्यान, ‘द व्हॅक्सिन वॉर’ हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून नाना पाटेकर सहा वर्षांनी हिंदीत पुन्हा पुनरागम करणार आहेत. या चित्रपटात ते कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do not watch the vaccine war says user vivek agnihotri gets angry see reply hrc
Show comments