बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खान सध्या त्याच्या ‘जवान’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. नुकताच ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला. प्रेक्षकांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद दिला. शाहरुख सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK)सेशन घेतले. या वेळी शाहरुखला त्याच्या चाहत्यांनी काही प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांना शाहरुखने भन्नाट उत्तरे दिली आहेत.

हेही वाचा : सुयश टिळकच्या पत्नीची लोकप्रिय हिंदी मालिकेत होणार एण्ट्री; आयुषी अनुभव शेअर करत म्हणाली…

Saif Ali Khan
“दरोड्याचा प्रयत्न फसला…”, सैफ अली खानचे हल्लेखोराबाबत मोठे वक्तव्य; म्हणाला, “त्या बिचाऱ्या…”
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Chhaava
‘छावा’ चित्रपटातील मराठी अभिनेत्याचे ‘त्या’ हटवलेल्या सीनबद्दल वक्तव्य; म्हणाला, “मला खात्री…”
Khushi Kapoor
खुशी कपूरने कधी रिक्षाने प्रवास केलाय का? उत्तर देत म्हणाली, “आई-बाबांचा विरोध…”
Aditya Sarpotdar
मराठी चित्रपटांनी कमाईचे आकडे दाखवणे किती गरजेचे? ‘मुंज्या’चा मराठमोळा दिग्दर्शक म्हणाला, “वाईट सिनेमांचे…”
salman khan did not select in vivah movie
‘विवाह’मध्ये सलमान खानऐवजी शाहिद कपूरला का घेतलं होतं? दिग्दर्शक म्हणाले, “त्या भूमिकेसाठी निरागसपणा…”
Shahid Kapoor
“माझंच नशीब…”, शाहिद कपूरने ‘विवाह’ चित्रपटातून त्याला काढून टाकण्याची केलेली विनंती; खुलासा करत म्हणाला…
Abhijeet Chavan
“मेल्या, चप्पल तरी काढ”, नेटकऱ्याच्या कमेंटवर अभिजीत चव्हाण यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “तीच तर…”

किंग खानला‘आस्क एसआरके’सेक्शनमध्ये त्याच्या चाहत्याने, “तिकीट काढून स्वत:चे चित्रपट पाहतोस का?” असा प्रश्न विचारला यावर शाहरुख भन्नाट उत्तर देत म्हणाला, “तुम्ही केलेल्या कामाचा पगार तुम्ही स्वत: देता का?” सध्या शाहरुखने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जवानचा चित्रपटाचा ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने त्याने हे ‘आस्क एसआरके’सेशन घेतले होते.

हेही वाचा : हेमा मालिनी आणि अमिताभ यांच्या केमिस्ट्रीमुळे धर्मेंद्र यांनी ‘बागबान’ पाहण्यास दिला होता नकार? अभिनेत्री म्हणाल्या, “मला याबाबत…”

नेटकरी शाहरुखच्या उत्तरावर “एखाद्याला उत्तर कसे द्यायचे हे तुझ्याकडून शिकायला हवे” अशा कमेंट करत आहे. तसेच अनेकांनी शाहरुख खानच्या हजरजबाबीपणाचे कौतुक केले आहे.

हेही वाचा : “मला ते सहन करावं लागतं”, अमृता फडणवीसांनी केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; म्हणाले “माझी पत्नी…”

दरम्यान, शाहरुख खानचा बहुचर्चित जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये शाहरुखसह अभिनेत्री नयनतारा मुख्य भूमिकेत दिसेल. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुखचे चाहते आता ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Story img Loader