बॉलिवूड सेलिब्रिटीजचे लहानपणीचे फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन यांच्यापासून आलिया भट्टपर्यंत कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटीजचे लहानपणीचे फोटोज उपलब्ध आहेत. आता नुकतंच बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्या लहानपणीच्या काही आठवणी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून शेअर केल्या आहे. आपल्या लहान बहिणीबरोबरचे बालपणीचे फोटो तिने शेअर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या फोटोमध्ये त्या बॉलिवूड अभिनेत्रीला ओळखणं फारच कठीण झालं आहे. बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने नुकतेच हे फोटोज शेअर केले आहेत. मलायका ही कायम चर्चेत असते. सध्या ती तिच्या लहानपणीच्या दुर्मिळ फोटोंमुळे चर्चेत आहे. या फोटोमध्ये मलायकाला ओळखणे कठीण आहे. विशेषत: कुरळ्या केसांच्या लुकमधला मलायकाचा हा बालपणीचा फोटो पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. काही यूजर्स तिला टार्गेटही करत आहेत, एकाने कॉमेंट करत लिहिले की “दोघीही मध्यमवर्गीय मुलींसारख्या दिसत आहेत, पण श्रीमंत माणसाशी लग्न केल्यानंतर त्या किती बदलल्या आहेत!”

आणखी वाचा : “म्युझिक माफिया आहेच…” ‘मायरी’फेम पलाश सेन यांनी केली संगीतविश्वातील लोकांची पोलखोल

मलायका अरोराने ‘सिबलिंग डे’निमित्त बहीण अमृताबरोबरचे हे बालपणीचे खास फोटो शेअर केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, आजरपणापासून आरोग्यापर्यंत, तू नेहमी माझ्या पाठीशी असते, आणि हो ही एक प्रचंड वाईट हेयरस्टाइल आहे. #sisterlove #arorasisters.” मलायका तिची बहीण अमृताला तिची बेस्ट फ्रेंड मानते. या दोन बहिणींची एक गर्ल गँगही आहे, ज्यात करीना कपूर आणि करिश्मा कपूरही असतात. या चौघी मैत्रिणींचे पार्टी करतानाचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

मलायकाने सलमान खानचा भाऊ अरबाज खानबरोबर घटस्फोट घेतल्यावर ती आणखी चर्चेत आली, सध्या ती अर्जुन कपूरबरोबर रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा आहे. नुकतंच मलायकाचा एक टॉक शो चांगलाच गाजला, त्यात या दोघी बहीणींमधील नात्याचा उलगडा झाला. शिवाय मलायका नुकतीच गुरू रंधावाच्या ‘तेरा की ख्याल’ या डान्स नंबरमध्ये दिसली होती. बऱ्याच कालावधीनंतर मलायकाला प्रेक्षकांनी गाण्यावर थिरकताना पाहिलं. तिचं हे गाणंही सध्या चांगलंच गाजत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do you recognize this bollywood actress in childhood photos she is related to salman khan avn