Govinda Health Update: अभिनेता गोविंदाला त्याच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून पायाला गोळी लागली आणि तो जखमी झाला. त्याच्या पायात गोळी घुसली होती ती डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढली आहे. सध्या त्याच्यावर क्रिटिकेअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती कशी आहे, त्याबद्दल त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माहिती दिली आहे.

गोविंदा पहाटे कोलकात्याला जाण्याच्या तयारीत होता. तो आपली परवाना असलेली बंदुक कपाटात ठेवत असताना त्याच्या हातातून ती पडली आणि एक गोळी त्याच्या पायाला लागली. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. गोविंदाला डाव्या गुडघ्याखाली गोळी लागली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
unknown people beaten up doctor by saying not treating girl properly
ठाणे : मुलीवर व्यवस्थित उपचार केले नसल्याचे म्हणत डॉक्टरला मारहाण
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला १०० दिवसांचे लक्ष्य
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
What is the National Health Claim Exchange health insurance
आरोग्य विम्याची प्रक्रिया आता जलद? काय आहे ‘नॅशनल हेल्थ क्लेम एक्स्चेंज’?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…

हेही वाचा – Video: कौटुंबिक वाद विसरून गोविंदाच्या भेटीला पोहोचली कश्मीरा शाह, कृष्णा अभिषेक परदेशात असल्याची माहिती

डॉक्टर काय म्हणाले?

त्याच्यावर उपचार करणारे डॉ. अग्रवाल माध्यमांशी बोलताना म्हणाले, “ते आयसीयूमध्ये आहेत. ड्रेसिंग केली आहे आणि ते आराम करत आहेत. त्यांची प्रकृती चांगली आहे. ते पहाटे ५ वाजता माझ्याकडे आले होते, तिथून आम्ही त्यांना रुग्णालयात आणलं. ६ वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. गोळी काढायला दीड तास लागला. त्यांना दोन दिवसांनी डिस्चार्ज देण्यात येईल. त्यांना डाव्या गुडघ्याच्या खाली गोळी लागली आहे.”

हेही वाचा – गोळी लागल्यावर गोविंदाची पहिली प्रतिक्रिया; डॉक्टरांचे आभार मानत म्हणाला…

गोविंदाची प्रतिक्रिया

“नमस्कार, मी गोविंदा.. तुम्हा सर्वांच्या आणि माझ्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. मला पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. मी येथील डॉक्टरांचे आभार मानतो. प्रार्थनासाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद,” अशी प्रतिक्रिया गोविंदाने दिली आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला स्वतःच्याच बंदुकीतून लागली गोळी, पत्नीने दिली प्रकृतीबद्दल माहिती

दरम्यान गोविंदाची विचारपूस करण्यासाठी त्याचे भाऊ किर्ती कुमार रुग्णालयात गेले होते. तसेच त्याचा भाचा कृष्णा अभिषेक परदेशात आहे, पण त्याची पत्नी कश्मीरा शाह हिने गोविंदाची रुग्णालयात भेट घेतली. गोविंदाची पत्नी मुंबईत नव्हती, पण तिने ती लवकरच परतणार असून गोविंदाची प्रकृती आता चांगली आहे, असं सांगितलं.

Story img Loader