‘गँग्स ऑफ वासेपूर’ चित्रपटातून आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. मूळची दिल्लीची असून नाटकांमधून तिने काम करण्यास सुरवात केली. अभिनयनात करियर करण्यासाठी तिने २००८ साली मुंबई गाठली. तिचे वडील हॉटेल व्यवसायात असून तिचा भाऊ साकिब सलीमदेखील अभिनय क्षेत्रात आहे. हुमाने काही वर्षातच आपल्या अभिनयनाने प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘डेढ इश्किया’, ‘बदलापूर’ ‘एक थी डायन’ या चित्रपटांमधून काम केले आहे. तिने ‘महारानी’ या वेबसीरिजमध्ये काम केले आहे. तिचा आगामी चित्रपट ‘डबल एक्सएलचा’ ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.

डबल एक्सएल’ हा चित्रपट बॉडी शेमिंगसारख्या विषयावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने माध्यमांशी बोलताना हुमाने सांगितले की चित्रपट असो किंवा लग्न जुळणाऱ्या वेबसाईट प्रत्येक ठिकाणी मुलगी सडपातळ, गोरी आणि सुंदर हवी असते, मुलगा कसाही असो. जेव्हा मी चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली तेव्हा माझ्या चित्रपटाचे समीक्षण करताना कोणीतरी लिहले होते हुमा कुरेशी सुंदर दिसते, परंतु मुख्य प्रवाहातील नायिकेसाठी तिचे वजन ५ किलो जास्त आहे. त्या समीक्षणातील ओळींनी माझे हृदय चिरल्यासारखे झाले होते.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
aadar jain alekha advani wedding videos
३ वर्षे बॉलीवूड अभिनेत्रीला केलं डेट, ब्रेकअपनंतर तिच्याच मैत्रिणीबरोबर थाटला संसार; अभिनेत्याच्या लग्नातील Video Viral
zee marathi navri mile hitelarla fame leela special ukhana
Video : “एजे तिळासारखे कडू अन् मी…”, लीलाने घेतला झकास उखाणा! तर, तुळजा काय म्हणाली? एकदा ऐकाच…
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मुलगी म्हणजे संधी नाही, जबाबदारी असते…”, भाग्याला छेडणाऱ्याला सूर्या देणार शिक्षा; नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आता झाला ना न्याय”
sandeep baswana on relationship with ashlesha sawant
मराठमोळ्या अभिनेत्रीसह २२ वर्षांपासून लिव्ह इनमध्ये राहतोय अभिनेता; लग्नाबद्दल म्हणाला, “मी कायम माझ्या…”
priya bapat praises riteish deshmukh
“जेव्हा मराठी माणसं हिंदी सेटवर भेटतात…”, रितेश देशमुखबद्दल काय म्हणाली प्रिया बापट? ‘ती’ गोष्ट प्रचंड भावली
Sheeba says Sunil Dutt made her method actress
“त्यांनी मला एका कोपऱ्यात बसून रडायला सांगितलं, कोणालाच…”; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला सुनील दत्त यांच्याबरोबर काम करण्याची आठवण

Photos : संसार नव्हे तर करिअरला प्राधान्य! बॉलिवूडमध्ये काम करण्यासाठी ‘या’ अभिनेत्रींनी सोडली पतीची साथ

सोनाक्षी सिन्हा आणि हुमा कुरेशी या चित्रपटातून लठ्ठ महिलांची कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ज्या आपली स्वप्न पूर्ण करू इच्छितात. सतराम रमानी यांच्या दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात लठ्ठ महिलांसंबंधी असलेल्या काही समस्या आणि गैरसमजांवर भाष्य केलं जाणार आहे. याच चित्रपटात शिखर धवन पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा एक विनोदी चित्रपट असून तो ४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सोनाक्षी आणि हुमाच्या त्यांच्यासोबत अभिनेता झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र दिसणार आहेत. या दोन कलाकारांशिवाय या चित्रपटात क्रिकेटर शिखर धवनही दिसणार आहे. शिखर या चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे.

Story img Loader