अभिनेता आयुष्मान खुराना सध्या त्याच्या ‘ड्रीम गर्ल २’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्मात्यांनी या चित्रपटाचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले होते. आता नुकताच ‘ड्रीम गर्ल २’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ‘ड्रीम गर्ल २’ हा आयुष्मान खुरानाच्या २०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ड्रीम गर्ल’चा सीक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचे संपूर्ण कथानक ‘पूजा’ या पात्रावर आधारलेले आहे.

आयुष्मान चित्रपटात स्त्रीवेश परिधान करून पूजाचे पात्र साकारतो. ड्रीम गर्ल बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. त्यामुळे आता प्रेक्षकांना ‘ड्रीम गर्ल २’ कडूनही अपेक्षा आहेत. ‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलरमध्ये आयुष्मान खुराना कर्जबाजारी झाल्यामुळे पुन्हा एकदा पूजाचा स्त्रीवेश परिधान करून गाणी गाण्यास, फोनवर बोलण्यास सुरुवात करतो असे दाखवण्यात आले आहे. त्याच्यासह अभिनेत्री अनन्या पांडे यामध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे.

satya movie rerelease
‘मुंबई का किंग कौन?…’, २६ वर्षांनी मनोज बाजपेयी यांचा ‘हा’ सिनेमा पुन्हा होणार प्रदर्शित
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
girl bedroom
“माझ्या बेडरुममध्ये…”, जेईईचा अभ्यास करणाऱ्या मुलीवर पाळत ठेवण्याकरता पालकांचा ‘हा’ निर्णय तुम्हाला पटतो का?
Year Ender Top Bollywood Stars Of 2024
Year Ender : ना आलिया, ना शाहरुख-दीपिका…; टॉप १० सेलिब्रिटींच्या यादीत ‘या’ अभिनेत्रीने गाठलं पहिलं स्थान, पाहा संपूर्ण यादी
Vishal Gawli News
Vishal Gawli : “विशाल गवळीने माझ्या मुलीला जवळ ओढलं, तिचं तोंड दाबलं आणि…”, पीडितेच्या आईने सांगितला दोन वर्षांपूर्वीचा ‘तो’ प्रसंंग
Vanita Kharat
“कॉपी करताना…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरात म्हणाली, “हिंमत तर एवढी…”
Aai Kuthe Kay Karte Fame Kaumudi Walokar Sangeet Ceremony
Video : “कौमुदी या अखंड ताऱ्यांच्या…”, फिल्मी स्टाइल प्रपोज, जबरदस्त डान्स अन्…; मराठी अभिनेत्रीचा ‘असा’ पार पडला संगीत सोहळा
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…

आणखी वाचा : Jailer Trailer : अ‍ॅक्शनचा भडिमार अन् सुपरस्टार रजनीकांत यांचा अनोखा अंदाज; बहुचर्चित ‘जेलर’चा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्मानच्या अभिनयाचं सध्या सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. ‘अंधाधूंन’पासून आयुष्मान खुराना हे नाव बॉलिवूडमध्ये फारच लोकप्रिय झालं आहे. नुकतंच ‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलर लॉंच सोहळ्यादरम्यान आयुष्मानने मनातील एक सुप्त इच्छा व्यक्त करून दाखवली. अन् ते ऐकताच तिथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी त्याला उत्तम दादही दिली.

‘ड्रीम गर्ल २’च्या ट्रेलर लॉंचदरम्यान आयुष्मान म्हणाला, “ह्यावेळी मला उत्तम अभिनेत्रीसाठी पुरस्कार मिळावा अशी माझी मनापसून इच्छा आहे, मी एवढं ड्रीम गर्लमध्ये काम केलं आहे तर एवढी अपेक्षा मी नक्कीच ठेवू शकतो.” आयुष्मानने या व्यक्त केलेली इच्छा ऐकून सगळेच मनसोक्त हसले. ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्याबरोबर परेश रावल, असरानी, राजपाल यादव, मनजोत सिंग आणि अनु कपूर यांसारखे अनुभवी कलाकार देखील दिसणार आहेत. हा चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader