मागच्या दोन आठवड्यांपासून ‘गदर २’ चित्रपट सिनेमागृहांमध्ये तुफान कमाई करत आहे. चित्रपटाने ४०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटासमोर अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ व अभिषेक बच्चनचा ‘घूमर’ चित्रपट टिकू शकले नाहीत, पण आता आयुष्मान खुरानाच्या ‘ड्रीम गर्ल २’ ने पहिल्याच दिवशी ‘गदर २’ ला टक्कर दिली आहे. ‘ड्रीम गर्ल २’ समोर ‘गदर २’ ची कमाई फिकी पडल्याचं पाहायला मिळालं.

Video: सुहाना खानला कसा वाटला बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेचा ‘ड्रीम गर्ल २’? दोन शब्दात Review देत म्हणाली…

Dhoom 4
रणबीर कपूरच्या ‘धूम ४’मध्ये खलनायक कोण असणार? दाक्षिणात्य अभिनेत्याची वर्णी लागण्याची शक्यता
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Shiva
Video : “ही लग्नाची पत्रिका…”, शिवाला आशूच्या लग्नाचे आमंत्रण मिळणार अन्….; पाहा मालिकेचा प्रोमो
star pravah aboli serial new actress entry jahnavi killekar and mayuri wagh
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत २ नव्या अभिनेत्रींची एन्ट्री! जान्हवी किल्लेकरचा पहिला लूक आला समोर, तर दुसरी नायिका कोण?
premachi goshta 2
मराठी चित्रपट ‘प्रेमाची गोष्ट २’ची रिलीज डेट ठरली, ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
akshay kumar filing kite with paresh rawal
Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ
Titeeksha Tawade
Video : ‘लव्हयापा’ म्हणत तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ; एकता व ऐश्वर्या नारकरांनी दिली साथ, पाहा व्हिडीओ
Game Changer vs Fateh Box Office Collection Day 1
‘गेम चेंजर’ व ‘फतेह’पैकी बॉक्स ऑफिसवर कोणी मारली बाजली? दोन्ही सिनेमांच्या कमाईचे आकडे आले समोर

ड्रीम गर्ल २ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली?

राज शांडिल्य दिग्दर्शित ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट या शुक्रवारी (२५ ऑगस्ट) चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ड्रीम गर्ल २’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे प्रारंभिक आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ड्रीम गर्ल २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ९.७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

“ते २० वर्षांपासून वेगळे राहायचे”, वडील रवींद्र महाजनींबद्दल लेक गश्मीरचा खुलासा; कारण सांगत म्हणाला, “त्यांच्याशी आमचं नातं…”

गदर २ ची कमाई किती?

गेले दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर राज्य करणाऱ्या गदर २ च्या कमाईत मोठी घट झाली आहे. ‘सॅकनिल्‍क’च्‍या रिपोर्टनुसार, ‘गदर २’ ने १५ व्‍या दिवशी ६ कोटी रुपये कमावले आहेत. त्यानंतर चित्रपटाचे एकूण कलेक्शन ४२५ कोटी रुपये झाले आहे. या चित्रपटापेक्षा आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाने नक्कीच चांगली कमाई केली आहे.

संजय वर्मा यांचे निधन, एक दिवसाआधीच त्यांच्या चित्रपटाला मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

दोन्ही चित्रपटातील कलाकार

दोन्ही चित्रपटातील स्टारकास्टबद्दल बोलायचं झाल्यास ‘गदर २’ मध्ये सनी देओल, अमीषा पटेल व उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर, ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी आणि सीमा पाहवा अशी तगडी स्टारकास्ट आहे.

Story img Loader