ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘गदर २’ व ‘ओएमजी २’ ने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. या दोन चित्रपटांनंतर आयुष्मान खुराना व अनन्या पांडेचा ‘ड्रीम गर्ल २’ शुक्रवारी प्रदर्शित झाला, या चित्रपटालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दोन दिवस दमदार कमाई करणाऱ्या या चित्रपटाच्या तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे.
‘ड्रीम गर्ल २’ पुढे ‘गदर २’ची जादू फिकी, आयुष्मान खुरानाच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी कमावले तब्बल…
‘ड्रीम गर्ल २’ हा २०१९ मध्ये आलेला सुपरहिट चित्रपट ‘ड्रीम गर्ल’चा सिक्वेल आहे. ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये आयुष्मान खुराना पुन्हा एकदा पूजाच्या भूमिकेत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटालाही प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करत आहेत. कमाईच्या आकडेवारीवरून प्रेक्षकांना हा चित्रपट आवडल्याचं दिसत आहे.
भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”
‘ड्रीम गर्ल २’ ने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १०.६० कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ झाली आणि त्याने १४.२ कोटींचा गल्ला जमवला. आता तिसऱ्या दिवसाची आकडेवारी समोर आली आहे. जी आधीच्या दोन्ही दिवसापेक्षा जास्त आहे. ‘ड्रीम गर्ल २’ च्या तिसऱ्या दिवसाच्या प्रारंभिक आकडेवारीनुसार, रविवारी या चित्रपटाने तब्बल १६ कोटी रुपयांची कमाई केली. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटाने तीन दिवसात एकूण ४०.७१ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
‘ड्रीम गर्ल २’ चे तीन दिवसांचे कलेक्शन चांगले आहे. अवघ्या ३५ कोटींच्या कमी बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट तीन दिवसातच ४० कोटी रुपये कमावण्यात यशस्वी ठरला आहे. आयुष्मान खुरानासह अनन्या पांडे बऱ्याच दिवसांनी बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला यश मिळाल्याचा आनंद साजरा करत आहे. हा चित्रपट सोमवार किंवा मंगळवारी ५० कोटींचा आकडा गाठेल.
“बौद्ध, जैन, लिंगायत, शीख सगळे हिंदूच आहेत”, शरद पोंक्षेंचे वक्तव्य; म्हणाले, “गौतम बुद्ध…”
दरम्यान, ‘ड्रीम गर्ल २’ मध्ये आयुष्मान खुराना, अनन्या पांडे, अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी आणि सीमा पाहवा या दिग्गज कलाकारांची मांदियाळी आहे.