आयुष्मान खुराना व अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ २५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसात ४० कोटींची कमाई केली. त्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच सोमवारी हा चित्रपट किती कमाई करतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तर, चित्रपटाच्या चौथ्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ड्रीम गर्ल २’ ला प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यश; फक्त ३५ कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाने तीन दिवसांत कमावले तब्बल…

‘ड्रीम गर्ल २’ ने पहिल्या दिवशी १०.६९ कोटी रुपयांची कमाई केली होती, तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी चित्रपटाने १४.०२ कोटींची कमाई केली. तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली. रविवारी चित्रपटाने तब्बल १६ कोटींचा गल्ला जमवला. आता चौथ्या दिवसाचे प्रारंभिक आकडेही आले आहेत.

भगवद्गीता की संविधान? शरद पोंक्षे म्हणाले, “क्षणाचाही विलंब न करता मी…”

‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ड्रीम गर्ल २’ ने रिलीजच्या चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या सोमवारी अंदाजे ४.७० कोटींची कमाई केली आहे. यासोबतच ‘ड्रीम गर्ल २’ची ४ दिवसांची एकूण कमाई आता ४५.४१ कोटींवर गेली आहे. बॉक्स ऑफिसवर आधीच राज्य करणाऱ्या ‘गदर २’ आणि ‘OMG 2’ ला टक्कर देत ‘ड्रीम गर्ल २’ देखील प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरला. इतकंच नाही तर कमी बजेट असलेला हा चित्रपट बॉक्सवरही जबरदस्त कलेक्शन करत आहे.

हा चित्रपट आज ५० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करेल, असं दिसतंय. याशिवाय रक्षाबंधनाच्या सुट्टीचाही या आठवड्यात चित्रपटाला फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या कलेक्शनमध्ये वाढ होऊ शकते. या चित्रपटात आयुष्मान खुराना, अनन्या पांडे यांच्यासह अन्नू कपूर, मनजोत सिंग, अभिषेक बॅनर्जी, विजय राज, परेश रावल, राजपाल यादव, मनोज जोशी यांच्या भूमिका आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dream girl 2 box office collection day 4 ayushmann khurrana ananya panday film earns 4 crore hrc