आयुष्मान खुराना व अनन्या पांडेच्या मुख्य भूमिका असलेला ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपट प्रदर्शित होऊन आता एक आठवडा झाला आहे. अत्यंत कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची गेल्या आठ दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम आहे. चित्रपटाला सुट्टीच्या दिवसांत चांगला प्रतिसाद मिळालाच, पण इतर दिवशीही प्रेक्षकांनी चित्रपट पाहायला गर्दी केली. त्यामुळे चित्रपटाला एका आठवड्यातच चांगली कमाई करता आली.

Video: “हिंदू धर्मात काय वाईट होतं की तू इस्लाम स्वीकारला”? प्रश्न ऐकताच राखी सावंत गोंधळली; क्षणभर विचार केला अन्…

‘ड्रीम गर्ल २’ च्या सातव्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. ‘सॅकनिल्क’च्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, ‘ड्रीम गर्ल २’ ने गुरुवारी भारतात ८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. तर सहाव्या दिवशी चित्रपटाने ७.७५ कोटी रुपये कमावले होते. यासोबतच ‘ड्रीम गर्ल २’ची ७ दिवसांची एकूण कमाई आता ६७.५० कोटींवर पोहोचली आहे.

‘ड्रीम गर्ल २’ च्या कमाईत सहाव्या दिवशी मोठी वाढ, बजेट अवघे ३५ कोटी पण आतापर्यंत कमावले तब्बल…

ड्रीम गर्ल २ ची सात दिवसांची कमाई

पहिला दिवस – १०.६९ कोटी रुपये
दुसरा दिवस – १४.२ कोटी रुपये
तिसरा दिवस – १६ कोटी रुपये
चौथा दिवस- ५.४२ कोटी रुपये
पाचवा दिवस – ५.८७ कोटी रुपये
सहावा दिवस – ७.७५ कोटी रुपये
सातवा दिवस – ७ कोटी रुपये
एकूण कलेक्शन- ६७.५० कोटी रुपये

“फातिमा नाही तर झॉम्बी”, उमराहवरून परतलेल्या राखीला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले, “मुंबईत आल्यावर तिचा बुरखा…”

दरम्यान, शनिवार व रविवारी विकेंडच्या दिवसात या चित्रपटाच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता आहे. अवघे ३५ कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने डबल कमाई सात दिवसात केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला, तर तो येत्या आठवड्यात १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो.