आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा यांचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट २०१९ मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आयुष्मान खुरानाने साकारलेली ‘पूजा’ची व्यक्तिरेखा खूप गाजली. आता आयुष्मान ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाचा सिक्वेल घेऊन येत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट करत ‘ड्रीम गर्ल २’ची घोषणा केली होती. आता नुकताच या चित्रपटातील आयुष्मान खुरानाचा पहिला लूक प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा- “घरी गाडी असून ऑडिशनला बसने जायचो, कारण…”, विकी कौशलने केला खुलासा; म्हणाला, “आई-वडिलांनी…”
आयुष्यमानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने त्याने या ड्रीम गर्ल २’मधील आपला लूक प्रदर्शित केला आहे. या पोस्टरमध्ये आयुष्यमान आरश्यात बघून लिप्स्टिक लावताना दिसत आहे. दर दुसऱ्या बाजूला त्याचा डबल रोल पूजा दिसत आहे तिही लिप्स्टीक लावताना दिसत आहे. या पोस्टरमुळे चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुक्ता वाढली आहे.
या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत. या पोस्टरवर आयुष्यमानच्या पत्नीनेही कमेंट केली आहे. पोस्टखाली तिने दोन हार्ट आय इमोजी शेअर केले आहेत. तसेच चाहते आयुष्यमानच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘मेक-अप, स्कर्ट आणि विगमध्ये माणूस इतका सुंदर कसा दिसतो.’ आणखी एका युजरने ‘मजा आ गया’ अशी कमेंट केली आहे.
चित्रपट २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आयुष्मान खुरानाबरोबर अनन्या पांडे, परेश रावल, राजपाल यादव, असरानी, विजय राज, मनोज जोशी, सीमा पाहवा, अभिषेक बॅनर्जी आणि मनज्योत सिंह यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत तर एकता कपूर या चित्रपटाची निर्माती आहे.