बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. अथिया शेट्टी व के.एल.राहुलनंतर बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी विवाहबंधनात अडकली. त्यांच्यापाठोपाठ आता बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक पाठकही लग्नाच्या बेडीत अडकला आहे. ९ नोव्हेंबरला अभिषेकने गर्लफ्रेंड शिवालिका ओबेरॉयशी लग्नगाठ बांधली.
अभिषेकने सोशल मीडिया अकाऊंटवरुन विवाहसोहळ्यातील फोटो शेअर केले आहेत. लग्नासाठी अभिषेकने पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी परिधान केली होती. फेटा घातल्यामुळे अभिषेक राजबिंडा दिसत होता. तर शिवालिकाने लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला होता. खड्यांची ज्वेलरीने तिने शाही लूक केला होता. अभिषेक व शिवालिकाने लग्नगाठ बांधत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कलाविश्वातील सेलिब्रिटींसह अनेक चाहत्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवलिका ओबेरॉयने ‘ये साली आशिकी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने ‘खुदा हाफिज’ आणि ‘खुदा हाफिज २’ मध्ये काम केलं आहे. ‘खुदा हाफिज’ चित्रपट अभिषेक पाठकने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या सेटवरच अभिषेक पाठक आणि शिवालिका ओबेरॉय यांची भेट झाली. त्यानंतर अभिषेकने टर्कीमध्ये शिवालिकाला प्रपोज केलं होतं.
हेही वाचा>> “ए शेंबडी…” ‘बिग बॉस’ फेम एमसी स्टॅनसाठी उर्फी जावेदने केलेलं ट्वीट चर्चेत
अभिषेक पाठकने २०२२ मध्ये अजय देवगणचा ‘दृश्यम २’चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाने बॉक्स २४० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता नवीन वर्षात अभिषेक लग्न करून वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली आहे.