अभिनेत्री श्रिया सरन सध्या ‘दृश्यम २’मुळे सातत्याने चर्चेत आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याआधी ती प्रमोशनच्या कार्यक्रमांना हजेरी लावताना दिसली होती. ‘दृश्यम २’मध्ये श्रिया सरन मुख्य भूमिकेत असून तिच्या अभिनयाचं प्रेक्षकांकडून जोरदार कौतुक होताना दिसत आहे. पण आता श्रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय ज्यामुळे तिला जोरदार ट्रोलही केलं जात आहे. या व्हिडीओतील तिच्या एका कृतीमुळे तिला नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं आहे.
अभिनेत्री श्रिया सरन नुकतीच पती आंद्रेई कोस्चिवबरोबर एअरपोर्टवर दिसली होती.यावेळी श्रिया सरनने फोटोग्राफर्सना फोटोसाठी पोजही दिली. पण यानंतर तिने सर्वांसमोरच आपल्या पती लिपलॉक किस केलं. असं करतानाचा तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तिला सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी खूप ट्रोल केलं. श्रियाचा हा अंदाज नेटिजन्सना अजिबात आवडलेला नाही. विरल भयानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
श्रिया सरनचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी कमेंट करून तिच्यावर जोरदार टीका केली आहे. एका युजरने या व्हिडीओ कमेंट करताना लिहिलं, “खूपच वाईट प्रकार आहे हा, कॅमेरा पाहून शो ऑफ करतेय…” तर दुसऱ्या एका युजरने, “सर्वांना माहीत आहे तुझा पती आहे ते.. मग असं काही करणं गरजेचं आहे का?” याशिवाय आणखी एका युजरने, “सार्वजनिक ठिकाणी असं काही करताना जरा तरी लाज बाळग” अशी कमेंट केली आहे.
आणखी वाचा-प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ‘दृश्यम २’ची रेकॉर्डब्रेक कमाई, जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला
दरम्यान ‘दृश्यम २’बद्दल बोलायचं तर, हा चित्रपट १८नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे आणि बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने १५.३८ कोटींची धमाकेदार ओपनिंग केली आणि दुसऱ्या दिवशीही यात मोठी वाढ केली आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २१.२० कोटींचं शानदार कलेक्शन केलं आहे. दोन दिवसांत चित्रपटाची कमाई ३६.५८ कोटींवर गेली आहे.