बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा २०१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. प्रेक्षकांना शेवटपर्यंत खुर्चीवर खिळवून ठेवण्यात हा चित्रपट चांगलाच यशस्वी झाला होता. सस्पेन्स थ्रिलर असलेल्या या चित्रपटातील अजय देवगणचा अंदाज प्रेक्षकांना खूपच आवडला होता. यानंतर आता लवकरच ‘दृश्यम’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटातील अनेक कलाकारांचे लूक समोर आले होते. त्यानंतर आता या चित्रपटातील अजय देवगणचा पहिला लूक समोर आला आहे.

अजय देवगणने ट्विटरवर त्याचा ‘दृश्यम’ चित्रपटातील पहिला लूक शेअर केला आहे. या लूकमध्ये तो फारच दमदार स्टाईलमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये अजय देवगणच्या हातात फावडे असल्याचे पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर मोठ्या ठळक अक्षरात ‘दृश्यम २’ असे लिहिण्यात आले आहेत.
आणखी वाचा : अजय देवगणच्या ‘दृश्यम २’चं पोस्टर प्रदर्शित, ‘या’ दिवशी टीझर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे पोस्टर शेअर करताना अजय देवगण म्हणाला, “प्रश्न हा नाही की तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला काय दिसतंय तर तुम्ही काय पाहात आहात हा प्रश्न आहे.” हे कॅप्शन पाहून त्याचे अनेक चाहते आणि प्रेक्षक बुचकळ्यात पडले आहेत. ‘दृश्यम’ प्रमाणेच ‘दृश्यम २’ चे डायलॉगही चांगले असणार याचा अंदाज प्रेक्षक या कॅप्शनवरुन लावत आहेत. अनेकांना अजयच्या पहिल्या लूकचे पोस्टर प्रचंड आवडले आहे.

आणखी वाचा: “माझ्या सासूबाई…” आई होण्याच्या प्रश्नावर प्रार्थना बेहरचे स्पष्ट उत्तर

अजय देवगणचा ‘दृश्यम’ चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होतं. या चित्रपटात अजयसह श्रिया सरन, तब्बू, इशिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका होत्या. कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ६७.१७ कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. आता याचा दुसरा भाग येत्या १८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे. सध्या चित्रपटातील अनेक कलाकारांचे लूक समोर येण्यास सुरुवात झाली आहे.

Story img Loader