अभिनेता अजय देवगणची ऑनस्क्रीन लेक आई होणार आहे आणि त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा बाबा होणार आहे. ‘दृश्यम’ चित्रपटांमध्ये अजय देवगण यांच्या मोठ्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ता गर्भवती आहे. इशिताने २०१७ साली अभिनेता वत्सल शेठशी लग्न केलं होतं. वत्सलने ‘टार्झन’ चित्रपटात अजय देवगणच्या मुलाची भूमिका केली होती.
३२ वर्षीय अभिनेत्री इशिता दत्ता लवकरच आई होणार आहे. नुकतीच ती मुंबई विमानतळावर दिसली होती, तिथलाच तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये इशिता तिचा बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे. इशिता व वत्सल लग्नाच्या ६ वर्षांनंतर पालक होणार आहेत. इशिताने तपकिरी रंगाचा ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिने पापाराझींना पोजही दिल्या. तिच्या चेहऱ्यावर प्रेग्नन्सी ग्लोही दिसत होता. इशिताचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत.
दरम्यान, इशिता व वत्सलने २०१७ मध्ये लग्न केलं होतं. त्यापूर्वी ते एकमेकांना डेट करत होते. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असून एकमेकांबरोबरचे फोटो-व्हिडीओ शेअर करत असतात.