बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ‘दृश्यम’ चित्रपटाच्या या सिक्वेलसाठी प्रेक्षक आतुर होते. २०१५मध्ये ‘दृश्यम’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची उत्कंठावर्धक कथा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता तब्बल सात वर्षांनंतर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘’दृश्यम २ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. बॉलिवूड हंगामाने दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) १४.५० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच दृश्यम २ची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच प्रेक्षकांना दृश्यम २बद्दल उत्सुकता होती. ओपनिंग वीकेंडला(शनिवार-रविवार) चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.

हेही वाचा >> “१५ वर्षीय मुलाने मला विचित्र पद्धतीने स्पर्श…” सुष्मिता सेनने सांगितला ‘तो’ प्रसंग

हेही पाहा >> Drishyam 2: छोट्या अनुला ५० लाख, अजय देवगणला तब्बूपेक्षा दहापट पैसे; ‘दृश्यम २’साठी कोणी किती मानधन घेतलं पाहिलं का?

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटानंतर प्रदर्शनाच्या दिवशी चांगली कमाई करणारा ‘दृश्यम २’ हा दुसरा चित्रपट ठरला आहे. ब्रह्मास्त्रने पहिल्या दिवशी तब्बल ३६ कोटींचा गल्ला जमावला होता. ‘दृश्यम २’ने कार्तिक आर्यनच्या भूल भुलैय्या २ चित्रपटाचे बॉक्स ऑफिसवरील पहिल्या दिवसाचा रेकॉर्ड मोडला आहे. १४.११ कोटींची कमाई ‘भूल भुलैय्या २’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी केली होती.

हेही वाचा >> “व्यायामामुळे नाही तर प्रोटीन पावडर…” जिममध्ये वर्कआऊट करताना मृत्यू होण्याबाबत सुनील शेट्टीचं वक्तव्य

‘दृश्यम २’ चित्रपटात अजय देवगणसह तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही चित्रपटात झळकला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drishyam 2 box office collection day 1 ajay devgn film got second best opening after brahmastra know the details kak