२०१५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दृश्यम’ हा चित्रपट आजही लोकांच्या लक्षात आहे. अजय देवगणचा हा थरारपट प्रेक्षकांना फार आवडला होता. गोव्यामधील एका छोट्या गावामध्ये राहणाऱ्या विजय साळगावकरची गोष्ट या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली होती. या सुपरहिट चित्रपटाचा सिक्वेल लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर्स सोशल मीडियावर शेअर केले गेले. या पोस्टर्समार्फत कलाकारांचा लूक समोर आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच ‘दृश्यम २’ चा ट्रेलर यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला. ट्रेलरची सुरुवात “सत्य हे झाडाच्या बिजाप्रमाणे असते. तुम्ही त्याला कितीही लपवण्याचा प्रयत्न करा. ते बाहेर येणारच” या वाक्याने होते. चित्रपटाच्या पहिल्या भागाची कथा सिक्वेलमध्ये पुढे नेण्यात आली आहे. सात वर्षानंतरही पोलीस आय.जी. मिरा देशमुखच्या मुलाचा, सॅमचा शोध घेत असल्याचे दिसून येते. या प्रकरणावरुन पोलिसांनी अजूनही साळगावकर परिवारावर नजर ठेवत असल्याचे दिसून येते.

आणखी वाचा – “आई- बाबा आता खूप झालं…” वैशाली ठक्करच्या सुसाइड नोटमधून धक्कादायक खुलासा; ‘या’ दोघांच्या नावांचा उल्लेख

ही केस नव्या पोलीस अधिकाऱ्याच्या हातात जाते आणि तो त्याच्या पद्धतीने ती केस सोडवण्याचा प्रयत्न करतो अशी ‘दृश्यम २’ ची कथा असल्याचा अंदाज ट्रेलर पाहिल्यावर येतो. ट्रेलरच्या शेवटी विजय कंटाळून आपला गुन्हा मान्य करत कॅमेऱ्यासमोर कबुलीजबाब देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता विजयला पोलीस पकडतात की, तो आधीसारखा पुन्हा त्याच्या कचाट्यातून सुटतो हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पाहावा लागेल.

आणखी वाचा – पार्टीला जाताना एकता कपूर कपड्यावरून झाली ट्रोल, नेटकरी म्हणाले, “ख्रिसमस…”

पहिल्या भागातील जुन्या चेहऱ्यांसह काही नवे चेहरेही या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाले. अजय देवगण, श्रिया सरन, तब्बू यांच्यासह अक्षय खन्ना प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नवीन पोलीस अधिकाऱ्याचे पात्र तो साकारणार आहे. या चित्रपटाद्वारे मराठमोळा सिद्धार्थ बोडके बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनामुळे दिग्दर्शनाची धुरा अभिषेक पाठक यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. हा चित्रपट १८ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.