बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या चर्चेत आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये तो असल्याने त्याच्या चाहत्यांनामध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘दृश्यम २’ चित्रपटात तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला आहे. अक्षय खन्नाने आजवर अनेक चित्रपटात काम केले आहे. कधी रोमँटिक, कधी नकारत्मक, कधी तडफदार पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत तो दिसला आहे. हाच अभिनेता आमिर खानच्या तारे जमीन पर चित्रपटात दिसला असता, मात्र गणित बदलले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अक्षय खन्नाने मिडडेला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले की ‘तारे जमीन पर चित्रपटाचे लेखक अमोल गुप्ते यांनी आमिर खानकडे माझ्या नावाची शिफारस करण्यास सांगितले होते. आमिर आमिर आहे त्याने लेखकाला सांगितले की जो पर्यंत मला स्क्रिप्ट आवडत नाही तो पर्यंत मी कोणालाच चित्रपटासाठी विचारणार नाही. अमोल गुप्ते यांनी स्क्रिप्ट लिहून आमिरला दाखवली ती आमिरला इतकी आवडली की त्याने या चित्रपटात केवळ कामच नाही केले तर या चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले’.

तैमूर अन् जहांगीरचं भांडण झाल्यावर काय करता? सैफ म्हणाला, “मी तैमूरवर…”

अक्षय पुढे म्हणाला की, ‘मी आणि आमिर एकाच ठिकाणी चित्रीकरण करत होतो तेव्हा आमिर माझ्याकडे आला आणि त्याने हा या घटनेबद्दल प्रामाणिकपणे सांगितले. त्यावर मी त्याला सांगितले मला याबाबत कोणतीही अडचण किंवा तक्रार नाही. आमिरने या चित्रपटात उत्तमच काम केले आहे’. ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमिरने शिक्षकाची भूमिका साकारली होती.

अक्षय खन्ना याने १९९७ मध्ये त्याचे वडील विनोद खन्ना निर्मित ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही, मात्र अक्षयने या त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली होती. अक्षयने स्टेट ऑफ सीज: टेंपल अटॅक’ या चित्रपटाद्वारे ओटीटीवर पदार्पण केले, हा चित्रपट जुलै २०१२ मध्ये OTT प्लॅटफॉर्म ZEE5 वर प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drushyam 2 actor akshay khanna confessed that aamir khan replace his role in taare zameen par spg
First published on: 19-10-2022 at 15:23 IST