अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलरपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. ‘दृश्यम २’ पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करताना दिसत आहेतअजय देवगणसह ‘दृश्यम २’ मध्ये तब्बू, अक्षय खन्ना, श्रीया सरन, इशिता दत्ता या कलाकरांच्या मुख्य भूमिका आहेत. यातीलच इशिता दत्ता ही अभिनेत्री सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या निमित्ताने नुकतीच तिने नवभारत टाईम्सला मुलाखत दिली आहे. यात तिने चित्रपटाच्याबरोबरीने ‘मी टू’ बद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिला प्रश्न विचारण्यात आला की ‘तुझ्या बहिणीच्या तनुश्री दत्ताच्या मी टू मोहिमेमुळे तुला फायदा झालं कि तोटा?’ त्यावर इशिताने उत्तर दिले की “या कारणामुळे जर मला कोणी घाबरत असेल तर मला माहित नाही माझ्यासमोर आजतागायत असे कोणी आले नाही. मी ज्यांना भेटले आहे त्यांच्याकडे या ,मोहिमेबद्दल सांगण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत. ज्या मुद्दयांवर लोक बोलायला कचरत होते आता त्या मुद्द्यांवर चर्चा होऊ लागल्यात. मी असं म्हणते यामुळे जर काही बदल झाले असतील तर यामुळे काही लोक घाबरलेदेखील असतील मात्र भीतीमुळे जर काम करणार नसतील तर तो त्यांचा प्रॉब्लेम आहे. मला काहीच फरक पडत नाही.” अशा शब्दात तिने आपली प्रतिक्रिया दिली.

“तिच्यापेक्षा मी समंथाबरोबर…” रिषभ शेट्टीने ‘या’ अभिनेत्रीबरोबर काम करण्यास दिला नकार

बहीण तनुश्री दत्तबद्दल बोलताना ती असं म्हणाली की माझ्या बहिणीने करियरच्या सुरवातीला मला मदत केली आहे. ती नेहमीच म्हणते तुमच्या आयुष्यातील चुकीच्या अथवा योग्य निर्णयातून तुम्ही शिकत राहा. तनुश्री दत्ता सध्या बॉलिवूडमध्ये कार्यरत नसली तरी तिने ‘मी टू’ मोहीम सुरु केली होती.

इशिता दत्त मूळची झारखंडची असून तिने मुंबईत येऊन आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले आहे. तिने तेलगू चित्रपटात काम केले आहे. दृश्यम चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अभिनेता वत्सल सेठशी तिने आपली लग्नगाठ बांधली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drushyam 2 actress ishita dutta opene up about her sister tanushree dutta and mee too controversy spg