बॉलीवूडच्या अनेक कलाकारांकडे सध्या दुर्गा पूजाची धामधूम सुरू आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही बॉलीवूड कलाकार मनोभावे दुर्गा पूजा करताना दिसत आहेत. अभिनेत्री काजोलने नवरात्री उत्सवानिमित्ताने दुर्गा पंडालचं आयोजन केलं आहे. काजोल आपल्या कुटुंब आणि मित्र परिवारासह दुर्गा पूजेच्या उत्साहात करताना दिसत आहे. अभिनेत्री राणी मुखर्जी, अयान मुखर्जी आणि रणबीर कपूरसह अनेक बॉलीवूड कलाकारांनी देवीचं दर्शन घेतलं आहे. दुर्गा पंडालमधील काजोल आणि जया बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘मानव मंगलानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर काजोल आणि जया बच्चन यांचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये, काजोल दुर्गा पूजाच्या दुसऱ्या दिवशी फिकट केशरी रंगाच्या साडीत दिसत आहे. ज्यावर तिने स्लीवलेस ब्लाउज परिधान केलं होतं. तसंच तिने केसात विविध फुलांचा गजरा आणि चोकर सेट घातला होता. या लूकमध्ये काजोल खूप सुंदर आहे. तर जया बच्चन गडद पिवळ्या रंगाच्या साडीत पाहायला मिळत आहेत.
हेही वाचा – Video: आलिया भट्टने समांथा प्रभू समोर गायलं ‘ऊ अंटावा’ गाणं, व्हिडीओ होतोय व्हायरलं
जया बच्चन यांनी काजोलला पाहताच क्षणी घट्ट मिठी मारली. एवढंच नव्हे तर जया यांनी काजोलच्या गालावर किस केलं. सध्या दोघींचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नेटकरी काय म्हणाले?
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “सध्याच्या जया बच्चन आणि भविष्यातल्या जया बच्चन यांना बघा.” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं की, पहिल्यांदाच जया बच्चन यांना एवढ्या चांगल्या मूडमध्ये पाहिलं. तसंच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “दोघी सारख्या आहेत.”
हेही वाचा – Bigg Boss 18 : …म्हणून गुणरत्न सदावर्तेंनी ‘बिग बॉस’च्या घरात घातला गोंधळ, म्हणाले, “मी अन्न आणि पाणी…”
दरम्यान, काजोलच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची ‘लस्ट स्टोरीज २’मध्ये पाहायला मिळाली होती. तिच्याकडे अजून बरेच चित्रपट आहेत. ‘सरजमीन, ‘दो पत्ती’, ‘मां’ आणि ‘Maharagni- Queen of Queens’मध्ये काजोल झळकणार आहे.
© IE Online Media Services (P) Ltd