शाहरुख खान व दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाचा वाद आणखीनच पेटला आहे. चित्रपटामधील ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केल्याने बराच वाद सुरू आहे. सोशल मीडियावरूनही या चित्रपटाला विरोध दर्शवण्यात येत आहे. काही राजकीय मंडळींनीही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान सनी लिओनीने भगव्या रंगाची परिधान करून व्हिडीओ शेअर केला आहे.
आणखी वाचा – दीपिका पदुकोणच्या भगव्या रंगाच्या बिकिनीवर शाहरुख खानचा लूक भारी, लाखो रुपयांचा खर्च, शूजची किंमत आहे…
‘बेशरम रंग’ गाणं प्रदर्शित झाल्यापासून दीपिकाच्या भगव्या बिकिनीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भगवा रंग एका धर्मासाठी महत्त्वाचा आहे असं म्हणत अनेकांनी तिच्या या गाण्याला विरोध दर्शवला आहे. आता सनीने भगव्या रंगाचीच बिकिनी परिधान करत समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.
पाहा व्हिडीओ
सनीने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती समुद्रकिनारी पाण्यातच झोपलेली दिसत आहे. दरम्यान विविध पोझ देत कॅमेरामॅन सनीचे फोटो काढत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
सनीने भगव्या रंगाचे कपडे परिधआन केले आहेत. हिलाही बॉयकॉट करा, बॉयकॉट सनी लिओनी, भगव्या रंगाचे कपडे परिधान करू नकोस सनीचा हा व्हिडीओ पाहून अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. तिच्या या व्हिडीओला आतापर्यंत ५ लाखांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले आहेत.