ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. प्रभास, क्रिती सेनॉन व सैफ अली खान यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ट्विटरवर या चित्रपटाबद्दल दोन गट पडल्याचं दिसतंय. प्रभासच्या चाहत्यांनी चित्रपट ब्लॉकब्लस्टर असल्याचं म्हटलंय. पण, दुसरीकडे अनेकांना मात्र विविध कारणांनी हा चित्रपट फारसा आवडला नाही. त्यामुळे ते चित्रपटातील कलाकार व दिग्दर्शकावर टीका करीत आहेत.

एका हिंदू संघटनेने ‘आदिपुरुष’बाबत नाराजी व्यक्त केली आहे. या चित्रपटाविरोधात हिंदू सेनेच्या वतीने दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या चित्रपटात ‘रामायण’, ‘भगवान श्रीराम’ आणि हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. एवढा विरोध होऊनही चित्रपटाने पहिल्याच दिवशी जगभरात १४० कोटींची रेकॉर्डब्रेकिंग कमाई केली आहे, पण दुसऱ्या दिवसाच्या कलेक्शनला चांगलाच फटका बसू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

आणखी वाचा : “थोडीतरी लाज…” ‘आदिपुरुष’च्या १४० कोटींच्या कमाईची पोस्ट पाहून लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर भडकले नेटकरी

‘सॅकनीक’च्या रीपोर्टनुसार आदिपुरुषला होणारा विरोध पाहता याच्या दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये फार मोठा फरक जाणवू शकतो. दुसऱ्या दिवशी ‘आदिपुरुष’ ६० ते ६५ कोटींच्या घरात कमाई करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. इतकंच नव्हे तर नकारात्मक प्रतिक्रियांचा फटका जगभरातील कमाईवरही पडणार आहे, त्यामुळे जगभरात आदिपुरुष दुसऱ्या दिवशी १५० कोटींचा टप्पाच पार करू शकेल असं मीडिया रीपोर्टनुसार सांगितलं जात आहे.

पहिल्या दिवसाच्या कमाईच्या तुलनेत आदिपुरुषच्या कमाईत ३३ ते ३५% घसरण बघायला मिळू शकते. रविवार असल्याने या चित्रपटाला गर्दी होण्याची शक्यता आहे पण ‘आदिपुरुष’ची खरी ताकद ‘मंडे टेस्ट’नंतरच समोर येईल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहेत.

Story img Loader