जगप्रसिद्ध गायक Ed Sheeran सध्या त्याच्या भारतात आल्यामुळे चर्चेत आहे. लवकरच Ed Sheeran चाहत्यांसाठी मुंबईमध्ये लाइव्ह परफॉर्म करणार आहे. परंतु, त्याआधी त्याने भारतातील प्रसिद्ध कलाकार, गायक आणि शालेय विद्यार्थ्यांची भेट घेतली. Edचे व्हिडीओ आणि फोटोज सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतायत. अशातच आता Ed sheeranने बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची भेट घेतली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ed Sheeran ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचा आणि शाहरुख खानचा व्हिडीओ शेअर केला आहे. ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील गाण्यावर दोघांनी शाहरुखची सिग्नेचर पोज देत डान्स केला आहे. Edच्या प्रसिद्ध गाण्याचा उल्लेख करीत त्याने या व्हिडीओला कॅप्शन दिली आणि लिहिले, “धिस इज द शेप ऑफ अस (shape of us), एकत्रित आम्ही प्रेम पसरवतोय.”

Ed Sheeran आणि शाहरुख यांच्या या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकाने कमेंट करीत लिहिले, “अलेक्सा प्ले परफेक्ट”; तर अनेकांनी विचारले, “त्यांनी शेवटी किस केलं का?”

हेही वाचा… “अनेकदा मला गुदमरल्यासारखं…”, कतरिना कैफला बॉलीवूडमध्ये काम करताना आला होता ‘असा’ अनुभव, म्हणाली…

शाहरुखला भेटण्याआधी Ed Sheeran एका पार्टीमध्ये अरमान मलिकला भेटला. तिथे दोघांनी ‘बुट्टा बोम्मा’ गाण्यावर डान्स केला. त्याचा व्हिडीओ अरमानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. Ed Sheeran आणि अरमानचा हा व्हिडीओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘विकी डोनर’, ‘बाला’ या चित्रपटांतून लोकप्रिय झालेला बॉलीवूड अभिनेता व गायक आयुष्मान खुरानाचीसुद्धा Ed Sheeranने भेट घेतली. त्यांनी एकत्र फोटो काढले आणि याबाबतची पोस्ट आयुष्मानने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

दरम्यान, Ed Sheeranची परफेक्ट, शेप ऑफ यू ही गाणी जगप्रसिद्ध आहेत. त्याने अनेक प्रसिद्ध गाणी लिहिली आणि गायली आहेत. सध्या Ed Sheeran आशिया आणि युरोप टूर २०२४ चा भाग म्हणून भारतात परफॉर्म करणार आहे. त्याचा परफॉर्मन्स १६ मार्च रोजी मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सवर होणार आहे. Ed Sheeranचा भारतातील हा दुसरा कॉन्सर्ट असेल. २०१७ मध्ये त्याने पहिल्यांदा भारतात आपली अदाकारी सादर केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed sheeran and shahrukh khan danced on bollywood songs and gave shahrukh khan signature pose video viral he met gauri khan ayushmann khurrana armaan malik too dvr