बॉलीवूड व दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री एमी जॅक्सन सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. तिचा नुकताच बॉयफ्रेंडबरोबरचा लिपलॉक करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. त्यामुळे एमीच्या पर्सनल लाईफच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
लोकप्रिय टीव्ही सीरिज ‘गॉसिप गर्ल’मध्ये चक बॅसची भूमिका निभावणारा ब्रिटीश अभिनेता ॲड वेस्टविक व एमी जॅक्सन बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. नुकतेच दोघांनी इन्स्टाग्रामवर मुंबईतील टाईम स्पेंड करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यामधील एमी व ॲड वेस्टविकचा लिपलॉक करतानाचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मुंबईतील लोकप्रिय ठिकाण गेट वे ऑफ इंडियासमोर दोघं लिपलॉक करताना दिसत आहेत. हा लिपलॉकचा फोटो फक्त ॲडने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेही वाचा – ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रणबीर व ऋषी कपूर यांच्यात सतत व्हायचे वाद, जाणून घ्या कारण
हे फोटो शेअर करताना अभिनेत्यानं लिहिलं आहे की, “गेटवे २ इंडिया.” म्हणजे भारताचा दुसरा रस्ता. एमी व ॲडचे फोटो पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की, “तुला भारतात सर्वात चांगली गोष्ट काय वाटली?” ॲडने त्याला उत्तर देत लिहिलं की, “मी स्ट्रीट फूड खाल्लं, कमाल होतं.” काही नेटकऱ्यांनी त्याला वडा खाण्याचा सल्लाही दिला. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही ॲडच्या फोटोखाली कमेंट केली आहे. तिने लिहिलं आहे की, “कायम मी चक बॅसची चाहती असेन.”
दरम्यान, हॉलिवूडमधला लोकप्रिय चेहरा ॲड वेस्टविक आहे. २००६ साली ‘चिल्ड्रन ऑफ मॅन’च्या माध्यमातून अभिनेत्याने चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर त्याने २००७ ते २०१२ पर्यंत सीडब्ल्यू नेटवर्कच्या ‘गॉसिप गर्ल’मध्ये प्लेबॉय चक बॅकची भूमिका केली होती. ‘व्हाइट गोल्ड’मध्येही ॲड प्रमुख भूमिकेत पाहायला मिळाला होता.
एमी जॅक्सनने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘मद्रासपट्टिनम’ हा तिचा पहिला चित्रपट होता. तमिळ, तेलुगू व कन्नड चित्रपटानंतर अभिनेत्रीने ‘एक दीवाना था’ या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. मग ‘सिंह इज ब्लिंग’ आणि ‘फ्रीकी अली’ यांसारख्या चित्रपटात तिनं काम केलं आहे.