सालाबादप्रमाणे यंदाही ईद निमित्ताने सलमान खानच्या घराबाहेर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ईदच्या दिवशी भाईजानची एक झलक पाहण्यासाठी त्याच्या वांद्रे येथील ‘गॅलेक्सी’ घराबाहेर आज दिवसभरापासून चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यादरम्यान चेंगराचेंगरी व पोलिसांचा लाठीचार्ज झाला. तरी देखील चाहते भाईजानची एक झलक पाहण्यासाठी घराबाहेर थांबले होते. अखेर सलमान खानची झलक चाहत्यांना झाली आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहेत. शिवाय सलमानच्या सोशल मीडिया अकाउंटवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – Video: आमिर खानने कुटुंबासह साजरी केली ईद; पापाराझींना वाटली मिठाई, व्हिडीओ व्हायरल

“ईद मुबारक”, असं कॅप्शन लिहित सलमान खानच्या इन्स्टाग्रामवर नुकताच व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत, चाहत्यांना बाल्कनीतून सलमान खान ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. यावेळी सलमानचे वडील सलीम खान देखील पाहायला मिळत आहेत.

कधी हात जोडून, कधी हात उंचावून चाहत्यांना सलमान खान ईदच्या शुभेच्छा देताना दिसत आहे. भाईजानची झलक पाहून चाहते एकच आवाज करताना पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – सलमान खानच्या मुंबईतल्या घरासमोर चाहत्यांची तोबा गर्दी, पोलिसांचा लाठीचार्ज

दरम्यान, आज ईदचं औचित्य साधून खासदार श्रीकांत शिंदे यांनी सलमान खानची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. या भेटीचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाही तर ईदनिमित्ताने सलमानने आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा देखील केली. ‘सिकंदर’ असं चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा एआर मुरुगदास सांभाळणार आहेत. साजिद नाडियाडवालांची निर्मिती असलेला ‘सिकंदर’ चित्रपट पुढच्या ईदला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.