‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा बुधवारी (६ नोव्हेंबर रोजी) मुंबईत पार पडला. या कार्यक्रमात निर्माती एकता कपूरने केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. चित्रपटाच्या निर्मितीसाठी कोणाचीही मदत घेतलेली नाही, तसेच या चित्रपटाच्या माध्यमातून कोणत्याही धर्मावर टिप्पणी करत नसल्याचं तिने म्हटलं आहे. २००२ साली गोधरामध्ये काय घडलं होतं, ते या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचं एकता म्हणाली.

चित्रपटाबद्दल पंतप्रधान मोदींशी बोलणं झालं का?

पत्रकार परिषदेदरम्यान एकता कपूरला विचारण्यात आलं की, तिने हा चित्रपट बनवण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संवाद साधला होता का. कारण जेव्हा २००२ मध्ये ही घटना घडली तेव्हा मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. या प्रोजेक्टसाठी आपण पंतप्रधान मोदी किंवा केंद्र सरकारमधील कोणाचीही मदत घेतलेली नाही, असं एकताने स्पष्ट केलं. “मी कोणत्याही राजकीय गटाशी संबंधित नाही. मी फक्त सत्याच्या बाजूने आहे,” असं एकता म्हणाली. आज तकने हे वृत्त दिलंय.

shah rukh khan fan wrote a script for aryan khan
Video : ‘मन्नत’ बाहेर ९५ दिवस किंग खानच्या भेटीसाठी थांबला चाहता, आर्यन खानसाठी लिहिली स्क्रिप्ट; पण…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
AI lawyer responds to CJI Chandrachud's question
CJI DY Chandrachud to AI Lawyer: “भारतात फाशीची शिक्षा…”, सरन्यायाधीश चंद्रचूड यांचा AI वकिलाला प्रश्न; उत्तराने झाले सर्वच अवाक
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…

हेही वाचा – लग्नानंतर वर्षभरात पतीच्या अफेअरबद्दल समजलं, घटस्फोट घ्यायचा होता पण तरीही केला १२ वर्षे संसार; झीनत अमान कारण सांगत म्हणालेल्या…

चित्रपटाचं प्रदर्शन अन् महाराष्ट्रातील निवडणुका

‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय, त्याच काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहेत, याबाबत विचारल्यावर एकता म्हणाली, “चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख खूप आधी जाहीर झाली होती. याचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.”

हेही वाचा – “तोंड रक्ताने माखलेली एक…”, दिव्या भारतीच्या निधनाबद्दल बॉलीवूड अभिनेत्रीचा मोठा खुलासा; तिला पडताना ‘या’ व्यक्तीने पाहिल्याचा केला दावा

मी हिंदू आहे – एकता कपूर

या चित्रपटातून कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नसल्याचं एकताने स्पष्ट केलं. “मी हिंदू आहे, याचा अर्थ मी धर्मनिरपेक्ष आहे. मी कोणत्याही धर्मावर कधीच भाष्य करणार नाही कारण मी हिंदू आहे,” असं ती म्हणाली. तसेच सेन्सॉरशिपबद्दल विचारलं कोणालाच घाबरत नसल्याचं वक्तव्य तिने केलं.

हेही वाचा – घटस्फोटित अभिनेत्रीने ११ वर्षांनी मोठ्या आध्यात्मिक गुरूशी केलं दुसरं लग्न, फोटो झाले व्हायरल

‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २००२ रोजी गोधरामध्ये साबरमती एक्सप्रेसमध्ये घडलेल्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात विक्रांत मॅस्सी, राशी खन्ना, रिद्धी डोगरा यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन धीरज सरनाने केले आहे. हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.

Story img Loader