चित्रपटसृष्टीतील कलाकार हे सार्वजनिक कामांमध्येदेखील योगदान देताना दिसून येतात. त्याबरोबरच समाजाशी निगडित असलेल्या महत्त्वांच्या विषयांवर त्यांच्याकडून चित्रपटाद्वारे समाजाचे प्रबोधनदेखील केले जाते. अक्षय कुमार आणि अशा चित्रपटांचा जवळचा संबध असल्याचे पाहायला मिळते. आता मात्र सोशल मीडियावर अक्षय कुमार(Akshay Kumar)चा एक व्हिडीओ व्हायरल होत असून, एका ज्येष्ठ व्यक्तीने त्याच्या समस्येसंबंधीची तक्रार थेट अक्षय कुमारकडेच केल्याचे पाहायला मिळत आहे.

सार्वजनिक स्वच्छतागृहाबद्दल थेट अक्षय कुमारकडेच तक्रार

‘इन्स्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम चॅनेलने अक्षय कुमारचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार मतदान करून जात असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच वेळी एक व्यक्ती अक्षय कुमारकडे येते. तो गृहस्थ अक्षय कुमारला म्हणतो, “सर, तुम्ही जे टॉयलेट बांधून दिलं होतं. ते खराब झालं आहे, सडलं आहे. तर ते नवीन बांधून द्या. तीन-चार वर्षांपासून मी ते दुरुस्त करीत आहे.” त्यावर अक्षय कुमार म्हणतो, “मी बीएमसीवाल्यांना सांगतो. ते दुरुस्त करून देतील.” त्यावर तो ज्येष्ठ गृहस्थ म्हणतो, “त्यांच्या दुर्लक्ष करण्यामुळेच माझा खर्च झाला आहे. तुम्ही नवीन टॉयलेट बांधून द्या.” त्यावर अक्षय कुमार म्हणतो, “मी माझे काम केले आहे. आता ही जबाबदारी बीएमसीची आहे.” या संपूर्ण संभाषणादरम्यान अक्षय कुमार अत्यंत शांत पद्धतीने बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचा हा अंदाज चाहत्यांना आवडल्याचे पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्स करीत ‘खिलाडी’ कुमार म्हणजेच अक्षय कुमारचे कौतुक केले आहे. “खऱ्या आयुष्यातील हीरो”, “अक्षय कुमारबद्दल आदर वाढला”, अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत. तर काहींनी म्हटले आहे, “टॉयलेट २ चित्रपट येईल, तेव्हा ते दुरुस्त होईल”, “आज सापडला”, “चांगली तक्रार केली आहे”, “अंकल रॉक, अक्षय शॉक”, “असंच बोललं पाहिजे”, असे म्हणत नेटकऱ्यांनी आपली मते व्यक्त केली आहेत.

जुहू बीचच्या शेजारी अक्षय कुमारने सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले होते. २०१८ मध्ये त्याने हे स्वच्छतागृह बांधले होते. आता या व्हिडीओमध्ये ज्येष्ठ व्यक्ती त्या स्वच्छतागृहबद्दल तक्रार करताना दिसत आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: शिल्पा शिरोडकरला धाकट्या बहिणीने दिल्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, आहे दाक्षिणात्य सुपरस्टारची पत्नी

दरम्यान, अक्षय कुमारने ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटात मुख्य भूमिका केली होती. या चित्रपटाची कथा स्वच्छतेविषयी जनजागृती वाढविणाऱ्या आशयावर आधारित होती. या सिनेमाची मोठी चर्चा झाल्याचेही पाहायला मिळाले होते. अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचे, तर तो ‘सिंघम अगेन’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाने चांगली कमाई केली असल्याचेही पाहायला मिळत आहे.