बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. कधी बॉलिवूडवर निशाणा साधल्यामुळे तर कधी राजकीय घडामोडींवर भाष्य केल्यामुळे कंगना स्वतःकडे लक्ष वेधून घेत असते. कंगना सध्या तिच्या ‘इमर्जन्सी चित्रपटावर काम करत आहे. या चित्रपटात ती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.

इंदिरा गांधींच्या एका व्हायरल फोटोसहीत तिने ही इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये इंदिरा गांधींच्या फोटोवर पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे पहिले खासगी सचिव राहिलेल्या मुडापिल्लाइन ओम्मामन मिथाई यांनी इंदिरा यांचे वर्णन करताना लिहिलेलं एक वाक्य दिसत आहेत. मिथाई लिहितात, “त्यांचे (इंदिरा गांधींचे) नाक क्लियोपेट्रासारखे, डोळे पॉलीन बोनापार्ट आणि व्हीनस देवीप्रमाणे स्तन आहेत.”

Sharad Pawar Campaign, Wai-Khandala-Mahabaleshwar,
‘लाडक्या बहिणी’पेक्षा महिलांना संरक्षण हवे – शरद पवार
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Protest against obscene remarks of BJP leader Pasha Patel in Karjat Jamkhed by burning effigy
भाजप नेते पाशा पटेल यांच्या अश्लील वक्तव्याविरोधात कर्जत जामखेड मध्ये महिलांचा एल्गार, पुतळा जाळून निषेध
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
government that gives Rs 1500 as ladaki bahin is not doing favour to women
‘लाडक्या बहिणींनो’ कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
Chandrasekhar Bawankule, Chandrasekhar Bawankule ,
महाविकास आघाडीचा जाहीरनामा केवळ घोषणा, बावनकुळेंची टीका

WORLD MENS DAY : “खंबीर पुरुष कधी…”; बिग बॉस फेम स्नेहलता वसईकरच्या पोस्टने वेधलं लक्ष

इंदिरा गांधींच्या बाबतीत शेअर केलेल्या या पोस्टवर कंगनाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. “(अनेकांसाठी) स्त्री ही फक्त शरीरापुरती का मर्यादित असते? तिच्याकडे सर्व काही जिंकून घेणारं मन आहे, फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेण्याची इच्छाशक्ती आहे आणि एखाद्या हुकूमशाहासारखी शक्ती आहे… इंदिरा गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा”. असं कंगनाने स्पष्ट केलं आहे.

‘इमर्जन्सी चित्रपटात ती अभिनयाच्याबरोबरीने स्वतः दिग्दर्शनदेखील करत आहे. या चित्रपटात तिच्याबरोबरीने अभिनेता श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण, अनुपम खेर यांसह अभिनेत्री महिमा चौधरी महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसणार आहे.