भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लावलेल्या आणीबाणीच्या घटनेवर आधारित ‘इमर्जन्सी’ (Emergency) हा चित्रपट १७ जानेवारीला प्रदर्शित झाला होता. बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. शिवाय चित्रपटात तिने इंदिरा गांधींची भूमिका साकारली आहे. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. पॉलिटिकल ड्रामा असल्याने या चित्रपटाची भरपूर चर्चा झाली, मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट फ्लॉप ठरला.

त्यानंतर नुकताच १७ मार्चला हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी मध्यमावर प्रदर्शित झाला असून ओटीटीवर या चित्रपटाची प्रचंड प्रशंसा होत आहे. अलीकडेच, ‘कांटे’चे दिग्दर्शक संजय गुप्ता यांनी चित्रपटाचे खूप कौतुक केलं. याबद्दल ट्विट करत त्यांनी असं म्हटलं की, “आज मी कंगनाचा ‘इमर्जन्सी’ पाहिला. अगदी स्पष्टपणे सांगायचे तर मला तो पाहायचा नव्हता, कारण याबद्दल माझ्या मनात काही पूर्वग्रह होते. पण, कंगनाचा हा चित्रपट किती छान आहे. अभिनय आणि दिग्दर्शन दोन्ही उत्कृष्ट आहे.”

यावर आता कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. तसंच तिने चित्रपटसृष्टीवर टीकाही केली आहे. इंडिया टीव्हीशी बोलताना तिने संजय गुप्तांच्या वक्तव्यावर म्हटलं की, “त्यांनी पोस्टमध्ये मान्य केले की, त्यांच्या मनात पूर्वग्रह होते. तुम्ही आधीच मला समजून घेण्यात अपयशी झालेले आहात. माझ्याबद्दल फक्त नकारात्मक विचार करायची आणि मी अपयशी ठरेल अशी इच्छा करायची, मग तुम्हाला कसे कळेल की, मी नक्की काय केले आहे?”

कंगना रणौत
कंगना रणौत

यापुढे ती म्हणाली की, “मला वाटतं चित्रपट क्षेत्रातील लोक ज्या प्रकारचे चित्रपट बनवतात ते पाहता, त्यांनी माझ्याबद्दल पूर्वग्रह ठेवू नये. तुम्ही कोणत्या प्रकारचे चित्रपट बनवता हे पाहता माझ्या बुद्धीचा विस्तारित दृष्टिकोन तुम्हाला कसा कळणार? तुमची पात्रता काय आहे? मला समजून घेण्यासाठी तुमच्याकडे आवश्यक असलेली बुद्धी आहे का?”

कंगना रणौत
कंगना रणौत

दरम्यान, कंगनाने संजयचे ट्विट शेअर केले होते आणि उत्तर देत म्हटलं की, “इंडस्ट्रीने त्यांचा द्वेष आणि पूर्वग्रहांमधून बाहेर पडून चांगले काम स्वीकारले पाहिजे. संजय जी, माझ्याबद्दलचे पूर्वग्रह काढून टाकल्याबद्दल धन्यवाद. सर्व चित्रपट विचारवंतांना माझा संदेश आहे की, माझ्याबद्दल कोणतेही पूर्वग्रह मनात ठेवू नका आणि मला समजून घेण्याचा प्रयत्न करू नका, मी तुमच्या आवाक्याबाहेर आहे.”

Story img Loader