Emergency Ban In Bangladesh : कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटावर बांगलादेशात बंदी घालण्यात आली असून, यामागील प्रमुख कारण म्हणून भारत आणि बांगलादेश यांच्यातील सध्याचे तणावपूर्ण राजकीय संबंध दर्शवण्यात आले आहेत. हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार असून, त्यात १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळ दाखवण्यात आला आहे.

‘इंडियन एक्सप्रेस’ने यासंदर्भात सूत्राच्या हवाल्यानुसार एक वृत्त दिले आहे. एका सूत्राने सांगितले, “बांगलादेशात ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला रोखण्याचा निर्णय सध्याच्या तणावपूर्ण भारत-बांगलादेश संबंधांशी जोडलेला आहे. हा निर्णय चित्रपटाच्या कथेविषयी कमी आणि दोन्ही देशांमधील राजकीय परिस्थितीमुळे अधिक संबंधित आहे.”

Former Chief Minister Prithviraj Chavan regrets the misinformation spread about Dr Manmohan Singh
डॉ. मनमोहन सिंग यांच्याबाबत अपप्रचार; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची खंत
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
sachin pilgaonkar presents this international marathi film
“अमेरिकेतील मराठी लोकांनी…”, आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘या’ मराठी चित्रपटाची प्रस्तुती करणार सचिन पिळगांवकर; म्हणाले…
supreme court slam Punjab government
चुकीची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न, डल्लेवाल यांच्या आंदोलनावरून सर्वोच्च न्यायालयाचे पंजाब सरकारवर ताशेरे
anurag kashyap on kennedy not released
जगभरात गाजलेला ‘केनेडी’ सिनेमा का प्रदर्शित झाला नाही? अनुराग कश्यप नाराजी व्यक्त करत म्हणाला….
Manipur CM N. Biren Singh
Manipur Violence: मणिपूरच्या अशांततेचं पाप काँग्रेसचंच; पंतप्रधान मोदींवरील टीकेला उत्तर देताना बिरेन सिंह यांचा पलटवार
maharashtrachi hasyajatra director sachin goswami says It is hoped that Maharashtra will be troll-free in 2025
“२०२५मध्ये ट्रोलमुक्त महाराष्ट्र तरी व्हावा ही अपेक्षा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची पोस्ट, म्हणाले, “आज राजकारणात नीतिमत्ता, सभ्यता…”

हेही वाचा…बॉलीवूडच्या फ्लॉप हिरोच्या दुसऱ्या पत्नीने स्वीकारला इस्लाम धर्म, अभिनेत्यापेक्षा वयाने २६ वर्षांनी आहे लहान

‘इमर्जन्सी’ चित्रपटात भारताने १९७१ च्या बांगलादेश स्वातंत्र्य युद्धात घेतलेल्या भूमिकेवर प्रकाश टाकण्यात आला आहे. विशेषतः, शेख मुजीबुर रहमान (बांगलादेशाचे जनक) यांना भारताने दिलेल्या पाठिंब्याची कथा आणि बांगलादेशातील अतिरेकींनी त्यांची हत्या केल्याची घटनाही दाखवण्यात आली आहे, जी बंदीच्या निर्णयामागील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला आधीच उशीर झाला आहे. हा चित्रपट ६ सप्टेंबर २०२४ रोजी भारतात प्रदर्शित होणार होता. मात्र, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC/ सेन्सॉर बोर्डाकडून ) प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे त्याच्या प्रदर्शनाला विलंब झाला. भारतीय कायद्यांनुसार, चित्रपटाच्या सार्वजनिक प्रदर्शनासाठी चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून(CBFC) मंजुरी मिळणे आवश्यक असते.

हेही वाचा…Video : ‘भूत बंगला’च्या सेटवर अक्षय कुमारने उडवली पतंग; तर परेश रावल यांनी धरली फिरकी, व्हायरल झाला व्हिडीओ

‘इमर्जन्सी’ चित्रपट विविध वादांत अडकल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला उशीर झाला. सध्या हा चित्रपट भारतात १७ जानेवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा…आमिर खानच्या ‘त्या’ सिनेमाला युवराज सिंगच्या वडिलांनी म्हटले ‘अतिशय फालतू’; बॉलीवूड सिनेमांवरही केली टीका, म्हणाले…

‘इमर्जन्सी’ चित्रपटावर घालण्यात आलेली बंदी हा निर्णय भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय परिस्थितींमुळेच घेतला गेला असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतातील अनेक चित्रपटांचे बांगलादेशात होणारे प्रदर्शन भारत आणि बांगलादेशातील राजकीय संबंधांतील चढ-उतारांमुळे अडचणीत आले आहेत. ‘पुष्पा २’ देखील बांगलादेशात प्रदर्शित झाला नव्हता असे काही अहवाल सांगतात. परंतु, ‘भूल भुलैया ३’ हा चित्रपट भारतात आणि बांगलादेशात एकाच दिवशी (१ नोव्हेंबर) प्रदर्शित झाला. ‘ढाका ट्रिब्युन’ने दिलेल्या वृत्तानुसार ऑक्टोबर २०२४ मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री २’ चित्रपटाचा बांगलादेशातही प्रदर्शित झाला होता.

Story img Loader