बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचा ‘टायगर ३’ नुकताच प्रदर्शित झाला असून बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट धुमाकूळ घालत आहे. लवकरच हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ३०० कोटींचा टप्पा पार करेल अशीही शक्यता वर्तवली जात आहे. या चित्रपटात सलमानचं कौतुक होतच आहे, पण त्याबरोबरच यात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या इमरान हाश्मीही प्रचंड चर्चा आहे. इम्रानचं काम लोकांना पसंत पडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या सिरियल कीसर या प्रतिमेमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात आणि चर्चेत येणारा इमरान हाश्मी सध्या एका वेगळ्याच कारणामूळ चर्चेत आहे. नुकतंच इम्रानने एका मुलाखतीदरम्यान त्याच्या एका जुन्या वादग्रस्त विधानावर वक्तव्य केलं आहे आहे. इमरानने महेश भट्ट यांच्याबरोबर काही वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी इमरानने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे त्याला बरंच ट्रोल करण्यात आलं होतं.

आणखी वाचा : Tiger 3 Box office collection: भाईजानचा चित्रपट लवकरच पार करणार ३०० कोटींचा टप्पा; पाचव्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

९ वर्षांपूर्वी ‘कॉफी विथ करण’च्या रॅपिड फायर राऊंडमध्ये करणच्या प्रश्नांना उत्तर देताना इमरान हाश्मीने दोनवेळा ऐश्वर्याचा उल्लेख केला होता. “अभिषेक बच्चनकडून काय चोरी करायला आवडेल? या करणच्या प्रश्नावर इम्रानने अभिषेकची पत्नी म्हणजेच ऐश्वर्याचं नाव घेतलं होतं, तसंच ऐश्वर्याची तुलना त्याने प्लॅस्टिकशी केली होती. अर्थात ही सगळी मजा मस्करी केवळ करणच्या गिफ्टसाठी सुरू होती, परंतु त्यावेळी इमरानच्या या उत्तरामुळे त्याला भरपुर ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

याविषयी ‘झुम’शी संवाद साधताना तो म्हणाला, “अशा गोष्टींमुळे तुमचे शत्रू वाढतात आणि त्या गोष्टी हाताळणं फार कठीण असतं. परंतु मी आत्तासुद्धा कॉफी विथ करणमध्ये गेलो तरी मी असंच काहीतरी वादग्रस्त वक्तव्य करून आणखी गोंधळ निर्माण करेन. माझं इंडस्ट्रीतील कोणत्याही व्यक्तीशी वैर नाही, मला फक्त त्या शोमधील ते गिफ्ट हवं असतं आणि त्यासाठीच अशी विचित्र उत्तरं द्यावी लागतात.”

जेव्हा इमरान हाश्मीने ऐश्वर्या रायची तुलना प्लॅस्टिकशी केलेली त्यावेळी त्याला बरंच ट्रोल केलं गेलं अन् त्यामुळे त्याला याबद्दल जाहीर माफीदेखील मागावी लागली होती. त्यावेळी इम्रानने वक्तव्य केलं की, “माझा कोणालाही दुखवायचा हेतू नव्हता. मी स्वतः ऐश्वर्याचा चाहता आहे. ही त्या चॅटशोची रीत आहे, तुम्हाला तिथे अशीच उत्तरं द्यावी लागतात अन्यथा तुम्हाला गिफ्ट मिळत नाही. ऐश्वर्याच्या कामाचा मी प्रचंड आदर करतो.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emraan hashmi admits he made enemies after cotroversial statement about aishwarya rai avn