इम्रान हाश्मी बॉलीवूडमधील उत्कृष्ट अभिनेता मानला जातो. आपल्या अभिनयाबरोबरच तो त्याच्या चित्रपटांमुळेही अनेकदा चर्चेत असतो. अनेकदा तो सिनेस्टार्सबाबत केलेल्या वक्तव्यांमुळेही चर्चेत आला आहे. मात्र एकेकाळी रणबीर कपूरबरोबर रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या कतरिना कैफ आणि दीपिका पादुकोणला इम्रान हाश्मीने सल्ला दिला होता. या सल्ल्यानंर काही काळाने रणबीर आणि कतरिनाचे ब्रेकअप झाले होते.

करण जोहरच्या चॅट शोमध्ये इम्रानला रणबीर आणि कतरिनाला कोणता सल्ला देशील, असे विचारले होते. इम्रानने रणबीरला मुलींसोबत खेळणे थांबव, असा सल्ला दिला होता. पत्रकारांना, तुमच्याकडून जास्त अपेक्षा आहेत, असेही तो म्हणाला होता. त्याने दीपिका पादुकोण आणि कतरिना कैफला रणबीरला सोडण्याचा सल्ला दिला होता.

aayushman khurana
आयुष्मान खुरानाचा ताहिराबरोबर झाला होता ब्रेकअप; ‘हे’ होते कारण, अभिनेत्याने स्वत:चं केला खुलासा
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Eknath Shinde On Sharad Pawar
Eknath Shinde : शरद पवार-एकनाथ शिंदे संपर्कात आहेत का? मलिकांच्या ‘त्या’ विधानावर मुख्यमंत्र्यांचं भाष्य; म्हणाले, “दुसरा विचार…”
Uddhav Thackeray speech
“…अन् प्रियांका गांधींनी भाजपाचे दात घशात घातले”, पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आव्हानाला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?

हेही वाचा- शूटींगदरम्यान जखमी झाल्याच्या वृत्तांवर संजय दत्तचे ट्वीट, म्हणाला “माझी काळजी…”

रणबीर कपूर दीपिका पदुकोण आणि कतरिना कैफसोबत रिलेशनशिपमध्ये होता. पण या दोघींसोबतचे त्याचे नाते फार काळ टिकले नाही. दीपिका पदुकोणला काही काळ डेट केल्यानंतर रणबीरने तिच्याशी संबंध तोडले आणि कतरिनासोबत नाते जोडले. मात्र, कतरिना कैफ आणि रणबीर कपूर यांचेही ‘जग्गा जासूस’ चित्रपटानंतर ब्रेकअप झाले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला. याशिवाय रणबीर कपूरची दीपिका पदुकोणसोबत अजूनही चांगली मैत्री आहे. ब्रेकअपनंतरही दोघांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

हेही वाचा- “मी आरशात पाहिलं अन्…” त्वचेच्या रंगात झालेल्या बदलावर काजोलचे स्पष्टीकरण

विशेष म्हणजे ज्या इम्रानने कतरिनाला हा सल्ला दिला तो इम्रान रणबीरची बायको असलेल्या आलिया भट्टचा लांबचा चुलत भाऊ आहे. ज्या कतरिनाला इम्रानने रणबीरला सोडून दे, असं सांगितलं त्या इम्रानने बहीण आलियाला रणबीरच्या गळ्यात हार घालण्यापासून का रोखलं नाही, याची सध्या जोरात चर्चा सुरू आहे.

हेही वाचा- लहानपणी वडिलांना गमावलं, आर्थिक संकटामुळे उपाशीपोटी काढले दिवस अन्…; आता सलमानच्या चित्रपटात झळकणार अभिनेता

इमरान हाश्मीची चुलत बहीण आलिया भट्टसोबत रणबीर कपूर त्याच्या वैवाहिक जीवनात आनंदी आहे. तो एका मुलीचा बापही झाला आहे. दुसरीकडे रणवीर सिंगसोबत लग्न केल्यानंतर दीपिका पदुकोण आनंदी जीवन जगत आहे, तर कतरिना कैफने विकी कौशलला आपला जीवनसाथी बनवले आहे. इमरान हाश्मीबद्दल बोलायचे तर, तो मनीष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ मध्ये पहिल्यांदाच कतरिना कैफसोबत दिसणार आहे, या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत आहे.